esakal | मित्रांसोबत पार्टीला गेला, अन् पुढे काय झाले ते वाचाच

बोलून बातमी शोधा

NND22KJP01.jpg

समतानगर येथील चार मित्र गुरुवारी (ता. २२) दुपारी साडेबाराच्या सुमारास नांदेड तालुक्यातील पुयणी परिसरातील एक शेतावर पार्टी करण्यासाठी गेले होते.

मित्रांसोबत पार्टीला गेला, अन् पुढे काय झाले ते वाचाच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील समतानगर येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय युवकाचा पुयणी (ता. नांदेड) शिवारातील विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २१) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस जमादार श्री सुर्यवंशी करीत आहेत.

मित्रासमेवत गेले शेतावर 
समतानगर येथील चार मित्र गुरुवारी (ता. २२) दुपारी साडेबाराच्या सुमारास नांदेड तालुक्यातील पुयणी परिसरातील एक शेतावर पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर पाच वाजता परिसरातील लोकांना विहिरीत मृतदेह आढळून आला. यानंतर स्थानिकांनी लिंबगाव पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. सदरील मृतदेह बाहेर काढल्यानंतर चौकशी असता हा मृतदेह भगवानदास निवृत्ती नंदूरकर (वय ३७) यांचा असल्याची ओळख नातेवाईकांनी सांगितली. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा.....‘दोन घास उरवून दोन घासावरच जगतो आहे’...!

विहीरीत कमी पाणी
मृतदेह ऐंशी फुट खोल असलेल्या विहिरीत सापडला, त्या विहिरीत पाणी केवळ तीन फुट पाणी होते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. हा घातपाताचा प्रकार अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला, असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भगवानदास नंदूरकर यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ, असा परिसर आहे. देगलूर तालुक्यातील नंदूर येथे शुक्रवारी (ता. २२) दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. जी. वाघमोडे यांचे पुत्र तर पत्रकार कुलदीप नंदूरकर यांचे ते मोठे बंधू होत. या प्रकरणाचा तपास पोलिस जमादार श्री सुर्यवंशी करीत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे.... कापूस विक्रीसाठी २५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी

सोबतचे तीघे फरार
पार्टी करण्यासाठी गेलेले सोबतचे तीन जण फरार झाले, असून त्यांचा पोलिस शोध घेत आहे. त्यातील एक जण बेशुद्ध पडला होता. मात्र तोही घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात आले. मयताचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर याबाबत अधिक माहिती मिळेल, अशी माहिती लिंबगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पलेवाड यांनी दिली.