esakal | दहावी व बारावी परीक्षेसाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज- सभापती संजय बेळगे

बोलून बातमी शोधा

file photo}

नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

दहावी व बारावी परीक्षेसाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज- सभापती संजय बेळगे
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : बोर्डाच्या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या सर्व शाळांमध्ये आवश्यक फर्निचर, विद्युत व्यवस्था व इतर सुविधा कराव्यात. परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी दोन पथक तयार करावेत अशी सूचना नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज केली.

नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. सर्व शिक्षक या सर्वेक्षणात सहभागी झालेले आहेत. स्थलांतरित मुले दुसऱ्या गावी गेले असतील त्या गावी त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या कामात जिल्हा परिषदेच्या संबंधित सर्कलमध्ये सदस्यांनीही लक्ष घालावे असे आवाहन त्यांनी केले.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून 264 शाळांमध्ये एक हजार 689 मुलांचा प्रवेश करण्यात येणार आहे. ता. तीन मार्च ते 21 मार्च या कालावधीत आरटीई वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावेत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मागील सभेचा इतिवृत्तांत प्राथमीक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी वाचून दाखवला. नियोजित विषय चर्चेला घेतले. समितीचे ज्येष्ठ सदस्य व्यंकट पाटील गोजेगावकर, लक्ष्मण ठक्करवाड, साहेब धनगे, बबन बारसे, अनुराधा पाटील, ज्योत्स्ना नरवाडे, संध्याताई धोंडगे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

वर्ग खोल्या बांधण्यासाठी शाळांची यादी गटशिक्षणाधिकारी यांनी द्यावी. निजाम कालीन इमारत दुरूस्ती बांधकामासाठी राज्यास दोनशे कोटी निधी उपलब्ध होणार आहे. लोकसहभाग मिळाला तर यातील जिल्ह्याच्या वाट्याची रक्कम जिल्ह्याला भेटणार आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली. त्‍यामुळे लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सभापती संजय बेळगे यांनी केले.  
    
खाजगी शिकवणी वर्गामध्ये कोविडच्या नियमांचे पालन न करता विद्यार्थी जास्त प्रमाणात बसवत आहेत. या बाबीकडेही सभागृहाने लक्ष वेधले. जिल्हाधिकार्‍यांना याबाबत विनंती करण्याचे निवेदन करण्यात आले. बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रेय मठपती, बंडू आमदूरकर, दिलीप बनसोडे, सहायक कार्यक्रमाधिकारी विलास ढवळे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.