नांदेड : आगामी निवडणूक ‘हंगामात’ कुणाची जमीन होणार सुपीक?

भोकर तालुक्यात राजकीय मशागतीला प्रारंभ
Election District
Election Districtsakal

भोकर : आगामी काळात तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती निवडणुकीचा हंगाम सुरू होणार आहे. सर्वच पक्षांनी आता पासून राजकीय मशागतीला प्रारंभ केला आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे पीक जोमात आहे. त्यांच्या खळ्यावर विरोधक डोळा ठेवून असून आपली पोठडी भरून घेण्यासाठी डावपेच आखण्यात मश्गूल झाले आहेत. मतदार कुणाच्या सुपीक जमीनीवर पेरणी करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघ हा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असल्याने राजकीय पटलावर अग्रस्थानी आहे. मतदार काँग्रेसच्या बाजूंनी भक्कमपणे उभा असला तरी मागील लोकसभेला मतदारांनी ‘प्रताप’ दाखवीला आहे. याची खबरदारी घेवून चव्हाणांनी मतदारसंघ पिंजून काढून आपली घडी व्यवस्थित बसविण्यात यशस्वी झाले आहेत.

विविध विधायक विकासात्मक कामे सुरू करून नांदेडसह भोकर तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकला आणि विकास कसा असतो हे सिद्ध केले आहे. दरम्यानच्या काळात मागील दोन वर्षांपासून करोना महामारीने डोके वर काढल्याने बहुतांशी निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. आता थोडीशी उसंत मिळाल्याने निवडणूक आयोगाने ठरलेल्या वेळेत निवडणुका होतील असे जाहीर केले आहे. आगामी काळात तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाची मजबूत पक्कड असून विरोधकाला ‘चकमा’ देण्यासाठी काँग्रेस पक्ष आतापासूनच सावध भुमीका घेत आपले दमदार पाऊल टाकीत असल्याचे दिसून येते आहे.

ईच्छूक उमेदवार संभ्रमात

राज्यात महाविकास आघाडी सरकार असून स्थानिक पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्ष कशी वागणूक देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदचे (तीन गट), पंचायत समितीचे (सहा गण), तर नगरपालिकेचे (१९ वार्ड) आहेत. होवू घातलेल्या निवडणुकीत संख्या वाढणार असल्याने सोयीचा गट, गण आणि प्रभाग मिळेल की नाही यामुळे इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत.

राजकीय दौरे झाले सुरू

तालुक्यात प्रारंभी भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संक्रांतीच्या दिवशी दौरा करून मतदारांना शुभेच्छा दिल्या. त्यापाठोपाठ पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विकासकामांच्या निमित्ताने मतदारसंघात दौरा केला. भाजपवासी झालेले माजीमंत्री डॉ. माधवराव कीन्हाळकर यांनी तालुक्यातील मतदारांच्या घरी भेटी दिल्या. एमआयएम पक्षांनी जेलभरो आंदोलन करून चुणूक दाखवली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचीत बहुजन आघाडीत मात्र निरव शांतता असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com