Nanded News : चिमुरड्यांनी फुलवली शाळेत परसबाग; शिक्षकांनी केली मदत; करमाळा जिल्हा परिषद शाळेत उपक्रम

विशेष म्हणजे ही परसबाग जैविक व शेणखतांनी नैसर्गिकरित्या बहरली आहे.
zilla parishad student sowing brinjal chilli tomato onion garlic seeds school ground
zilla parishad student sowing brinjal chilli tomato onion garlic seeds school groundSakal

मारतळा : करमाळा (ता. लोहा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने उपलब्ध असलेल्या खोलींच्या पाठीमागे परसबाग तयार केली आहे. या परसबागेत झेंडू, गलांडा या फुलांबरोबरच पपई, सीताफळ, वांगी, मिरची, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर, कांदा, लसुण आदी भाजीपाला घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही परसबाग जैविक व शेणखतांनी नैसर्गिकरित्या बहरली आहे.

लोहा तालुक्यातील कापसी संकुलातंर्गत करमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी परसबागेत नैसर्गिकरित्या भाजीपाला तयार केला आहे. या ठिकाणी कोणतेही रासायनिक खते, औषधी वापरली नाहीत. शेतीतील काळी माती, झाडपाला, केरकचऱ्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत व शेणखताचा वापर करत बाग फुलवली आहे.

परसबागेत पिकविलेल्या फळांचा, भाजीपाल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात उपलब्धतेनुसार केला जातो. विद्यार्थ्यांना फळे, फुले व भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेतले जाते, रोपांची वाढ कशी होते, याचे कृतीतून शिक्षण देण्यात येत आहे.

विशेष म्हणजे स्वकष्टाने फुलवलेल्या बागेतील फळे, फुले व भाजीपाला पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. या परसबागेसाठी मुख्याध्यापक अशोक पाटील, सहशिक्षिका रेखा पर्वतीकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच शालेय पोषण आहार कामगार सुरेखा जाधव व शालेय विद्यार्थी मेहनत घेत आहेत.

या परसबागेत भाजीपाला व फळे यासाठी कोणतीही रासायनिक खते, औषधी वापरली जात नाहीत. त्याऐवजी झाडाचा पाला, केरकचऱ्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत व शेणखताचा वापर करून नैसर्गिकरित्या निर्मिती करण्यात आली आहे.

— अशोक पाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, करमाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com