Dussehra 2023 : रावणामध्येही होत्या चांगल्या गोष्टी ज्या प्रत्येक व्यक्तीने शिकल्याच पाहिजे

असे म्हणतात की रावण हा एक अतिशय शक्तिशाली राजा, महान विद्वान, सर्वज्ञानी अन् भगवान शिव शंकराचा महान भक्त होता
Dussehra 2023
Dussehra 2023esakal

Dussehra 2023 : दसरा किंवा विजयादशमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्री रामचंद्राने रावणाचा वध केला होता. यावर्षी हा उत्सव 5 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. रावणाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की रावण हा एक अतिशय शक्तिशाली राजा, महान विद्वान, सर्वज्ञानी अन् भगवान शिव शंकराचा महान भक्त होता.

पण त्याच्या अहंकारामुळे त्याचा नाश झाला. आजही अनेक ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. असे म्हणतात, रावणातही काही गुण चांगले होते. ज्यातून आजही लोकांनी काहीतरी शिकले पाहिजे. तर चला जाणून घेऊया रावणाला परम ज्ञानी का म्हणतात आणि काय होते रावणातले चांगले गुण...

(Good things in Ravana that every person should learn Vijayadashami Dasara Information 2022)

Dussehra 2023
Navratri 2022 : अष्टमीला देवीच्या जागराला करा काळ्या चण्याची चविष्ट भाजी

नेहमी कुटुंबासोबत उभे राहणे

रावणाच्या मनात लाखो दुष्कृत्ये असतील, पण तो सदैव आपल्या भावा-बहिणीच्या सन्मानासाठी समर्पित होता. विभीषणाचे विचार रावणापेक्षा पूर्णपणे भिन्न होते, तरीही त्याने आपल्या भावाला स्वतःपासून वेगळे केले नाही. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणाने सीतेचे अपहरण केले. शूर्पनखाच्या अपमानाचा बदला घेण्यात त्याने चुकीचे पाऊल उचलले अन् हेच त्याच्या ऱ्हासाचे कारण बनले. मात्र यातून एक शिकण्यासारखे आहे कि जेव्हा जेव्हा कुटूंबावर अडचणीची वेळ आली तेव्हा रावण संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला.

Dussehra 2023
Shardiya Navratri Jalgaon : इंद्रदेवजी नगरात महिलांच्या पुढाकाराने दुर्गोत्सव

प्रजेच्या हिताची काळजी घेणे

असे मानले जाते की रावणाच्या राज्यात त्याची प्रजा कधीच दुःखी नव्हती. रावणाच्या राज्यात त्याची प्रजा सुख-संपत्तीने भरलेली होती. तो एक अत्यंत कार्यक्षम राजा होता जो आपल्या प्रजेची खूप काळजी घेत असे. रावणाची प्रजा रावणावर खूप समाधानी होती. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी रावणाची पुजा केली जात असल्याचे समजते.

Dussehra 2023
Dussehra 2023 : दसर्‍याच्या दिवशी करा हे सोपे उपाय; अनेक त्रासातून होईल सुटका

मर्यादांचे उल्लंघन न करणारा

रावणाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे त्याने माता सीतेचे केलेल अपहरण. सितेचे अपहर केल्याने आता आपला काळ जवळ आला आहे हे रावणाला ठाऊक होते तरीही त्याने कधीही मर्यादांचे उल्लंघन केले नाही. असा उल्लेख रामायणात आहे. त्यांनी ज्या प्रकारे स्त्रीचा आदर राखला, तोच संयम आजही प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला हवा.

Dussehra 2023
Dussehra 2023 : सोनं घ्या सोन्यासारखं रहा! दसऱ्याला आपट्याची पाने का वाटली जातात?

सर्वज्ञानी रावण

असे म्हणतात की रावणाला चारही वेद आणि 6 उपनिषदांचे ज्ञान होते. रावणाला असलेली 10 डोकी या ज्ञानाचे प्रतीक होते. याच ज्ञान आणि बुद्धीच्या बळावर रावणाला त्याच्या शत्रूंनीही मान दिला. त्याला संगीताची आवड होती असे मानले जाते आणि तो एक अत्यंत कुशल वीणा वादक देखील होता असे पुराणात सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com