Aurangabad News
औरंगाबाद महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील एक महत्त्वाचे औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले असल्याचे सांगण्यात येते. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर असल्याचे मानले जाते. हे मराठवाड्याच्या राजधानीचे शहर आहे. पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक औरंगाबादच्या हद्दीत स्थित आहेत.