कॅनबेरातील राष्ट्रीय संस्कृती महोत्सवात भारतीय संस्कृतीचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

कॅनबेरा : सिडनी येथे 21व्या "राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव'संचलनामध्ये प्रथमच भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. या महोत्सवातील संचलनासाठी शिवगर्जना ढोल पथकात 70-80 मुले,महिला सहभागी होते. तीन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात वेगवेगळ्या संस्कृतींचे दर्शन घडते. सांस्कृतिक एकता निर्माण व्हावी, आपल्या संस्कृतीची देवाण-घेवाण व्हावी या उद्‌देश्‍यातून या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाचे यंदा एकविसावे वर्षे आहे. भारतीय संघ या महोत्सवात प्रथमच सहभागी झाला होता. 

या सांस्कृतिक संचलनात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविताना कलाश्री नृत्य अकादमीचे विद्‌यार्थी तसेच महाराष्ट्रारातील पारंपरिक वाद्‌ये ढोल-ताशा, झांजा तसेच बर्ची नृत्य, ध्वज अशा पारंपरिक गोष्टींचा समावेश होता. अशा शिस्तबध्द संचलनाकडे तीन लाखांहून अधिक सांस्कृतिक प्रेमी परदेशी नागरिक या महोत्सवाला आवर्जून उपस्थित असतात. 
सिडनीतील ढोल-ताशा पथकाचे नेतृत्व मिलिंद डेंगळे, नृत्य दिग्दर्शिका धनश्री करंदीकर यांनी बर्ची नृत्याचे दिग्दर्शन केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21st National Multicultural Festival parade on London Circuit

फोटो गॅलरी