esakal | विश्व मराठी परिषदेकडून दुबईत ब्लॉगलेखनची कार्यशाळा 
sakal

बोलून बातमी शोधा

dubai.jpg

विश्व मराठी परिषदेकडून दुबईत ब्लॉगलेखनची कार्यशाळा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्लॉगिंग क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. मराठी ब्लॉगर्सची आजची गरज किमान दोन लाख ब्लॉगर्स एवढी आहे आणि ती सतत वाढते आहे. याचा फायदा भारताबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांनासुद्धा व्हावा या उद्देशाने नुकतेच दुबई येथे विश्व मराठी परिषद आणि ग्रंथ तुमच्या दारी, यु. ए. ई. द्वारा ब्लॉगलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विश्व मराठी परिषदेच्या विश्व प्रतिनिधी प्रचिती तलाठी यांनी या कार्यशाळेचे आयोजन व मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत दुबईमधील विविध क्षेत्रातील लोकांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेमध्ये ब्लॉग म्हणजे काय?, ब्लॉग लेखनाचे प्रकार, विषयांची निवड-अभ्यास-मांडणी, तसेच ब्लॉग लेखनातून अर्थार्जनाच्या संधी इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रात्यक्षिकांद्वारा 'वर्डप्रेस' या ब्लॉग लेखनाच्या वेबसाईटवर प्रत्येक सहभागी व्यक्तीचा स्वतंत्र ब्लॉग बनविण्यात आला. 

''विश्व मराठी परिषदेच्या वतीने भविष्यातही अशा प्रकारच्या विविध उपयुक्त विषयांवरील कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात'', असे मत सहभागी व्यक्तींनी व्यक्त केले.

''भविष्यात विविध देशांमध्ये लेखन विषयक कार्यशाळा आयोजित करायचा विश्व मराठी परिषदेचा मानस आहे'', असे प्रतिपादन या प्रसंगी विश्व मराठी परिषदेचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले यांनी केले आहे. ''येत्या ५ वर्षांमध्ये भारताबाहेरील किमान एक हजार नवीन लेखकांची पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी विश्व मराठी परिषद प्रयत्नशील आहे'', असे ते म्हणाले.