esakal | Corona in Russia : देशाच्या आरोग्ययंत्रणेची पद्धतच वेगळी !
sakal

बोलून बातमी शोधा

amruta-pote

सध्या देशामध्ये सुमारे 53 हजार इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. असं असलं तरी मात्र ‘डेथ रेट’ अर्थात मृत्यूदर हा 456 इतका असून सध्या तरी तो कमी आहे. एकूणच इथली लोकसंख्या ही कमी आहे. 

Corona in Russia : देशाच्या आरोग्ययंत्रणेची पद्धतच वेगळी !

sakal_logo
By
ऋतुजा कदम

मी मेडिकलची विद्यार्थी असून MBBS च्या सहाव्या वर्षात शिक्षण घेते आहे. रशियाच्या स्मॉलेन्क्स या शहरात गेली सहा वर्षे राहतेय. सध्या जगभरात कोरोना व्हायरलसने थैमान घातले आहे आणि रशियाही त्यातून सुटलेला नाही. सध्या देशामध्ये सुमारे 53 हजार इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. असं असलं तरी मात्र ‘डेथ रेट’ अर्थात मृत्यूदर हा 456 इतका असून सध्या तरी तो कमी आहे. एकूणच इथली लोकसंख्या ही कमी आहे. देशातील सर्वाधिक केसेस या मोस्को शहरात आहेत. पण, त्यासाठी अतीशय खंबीर पावले उचलली जात आहेत. मोस्कोमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आठ नवी हॉस्पिटल तयार करण्यात आली आहेत. शिवाय आणखी २-३ हॉस्पिटल तयार होत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्मॉलेन्क्समध्ये 28 मार्चला कोरोना लागण झाल्याची पहिली केस समोर आली. टर्कीमधून आलेल्या एका महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले. आता इथे 208 पॉझिटिव्ह केसेसे असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला जेव्हा केसेस चार-पाच हजारांवर पोहोचल्या तेव्हा देशाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ५ एप्रिल पर्यंत एका आठवड्याचा लॉकडाऊन ठेवला होता. त्यानंतरही केसेस वाढल्या आणि आता आकडा 53 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. दुकाने, मॉल, शाळा, कॉलेज, सामाजिक मेळावे हे सर्व बंद करण्यात आले आहे. मात्र स्थानिक वाहतूक हि सुरुच आहे. कॉलेज आणि युनिव्हर्सिटी बंद असल्याने सर्व ऑनलाइन क्सास सुरु आहेत. नेहमीप्रमाणेच ऑनलाइन आम्हाला शिकवले जाते, असाइनमेंट दिल्या जातात. 

रशियाच्या आरोग्य यंत्राणाच्या कामाकाजाची पद्धत ही वेगळी आहे. एखादा व्यक्ती जर साध्या कोणत्याही कारणासाठीही दवाखान्यात दाखल झाला तर, त्याच्या सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची लिखित मेडिकल हिस्ट्री ही तपासली जाती. ती प्रत्येकाकडे असणे भाग असते. इथे खाजगी यंत्रणा नसून सर्व सरकारच्या नियंत्रणाखाली असते. त्यामुळे सर्व दवाखानेदेखील सरकारच्या देखरेखेखाली काम करतात. त्याचा फायदा म्हणजे प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक आरोग्याची माहिती ही रेकॉर्ड म्हणून ठेवली जाते. मी राहत असलेल्या प्रदेशात जवळपास एक हजार लोक कोरोनाबाधित पॉझिटिव्ह नाही पण संशयित आहेत. त्यामुळे या सर्वांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना काटेकोरपणे क्वारानंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे. 

रस्त्यावर काही प्रमाणात लोक दिसतात. वाहतुक सुरु आहे आणि लोक कारने फिरतात. पण, गेल्या एका आठवड्यापासून त्याचेही प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. इतर काही देशांप्रमाणे जीवनावश्यक गोष्टींची किंवा अन्न-धान्याच्या पुरवठ्याची कमतरता इथे नाही. सर्वकाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आमच्या युनिव्हर्सिटीने काळजी घेण्यासाठी मास्क पुरवले आहेत. आठवड्यातून एकदा जेव्हा कधी गरज पडते तेव्हा आम्ही हॉस्टेलजवळच असलेल्या दुकानात जातो. माझ्या युनिर्व्हसिटीने एक चांगला उपक्रमही सुरु केला आहे. बाहेर येता-जाताना नोंद करावी लागते आणि अर्धा तास बाहेर राहण्याची परवानगी आहे. मात्र त्यापेक्षा जास्त काळ तुम्ही बाहेर राहिलात तर, काही कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. 

रशियाची आरोग्य यंत्रणा खंबीर आहे. व्हेंटिलेटर, किट्स याची सोय आहे. जितके रुग्ण सध्या आहेत त्यांची संपूर्णपणे काळजी आरोग्य यंत्रणा घेऊ शकते. सेंट पिटर्सबर्ग किंवा मोस्को सारख्या शहरांमध्ये जास्त रुग्ण असल्याचे आढळत आहे. तिथे शक्यतो सर्वाधिक पर्यटक असतात. तिथे माझ्यामते ८५ टक्क्यांपर्यंत लोकांना सर्व पुरवठा होईल अशी व्यवस्था आहे. पण, राहिलेल्या लोकांची व्यवस्थाही सरकार करत आहे. त्यांच्यासाठी दवाखाने उभारले जात आहेत. युद्धपातळीवर म्हणजेच लवकरात लवकर हे दवाखाने तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्मॉलेन्क्समध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पण, तो फक्त कोरोनामुळे नाही तर Comorbidity  मुळे म्हणजेच आणखी एका आजारामुळे झाली आहे. त्याचे वयोमानही जास्त होते. दुसरीकडे टर्कीवरुन आलेल्या ज्या महिलेला कोरोना झाला होता ती आता बरी झाली आहे.

रशियात पर्यटन हे जास्त आहेच. मॉस्को, सेंट पिटर्सबर्ग, सायबेरिया अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी असतेच. त्यामुळे चिनी लोकांचीही इथे सर्वाधिक वर्दळ पाहायला मिळते. एवढचं काय इथे एअरपोर्टवरील सुचना लिहिलेल्या भाषांमध्ये पहिली रशियन मग इंग्रजी आणि त्यानंतर चायनिजमध्ये लिहिले जाते. इतका जास्त प्रभाव आहे. त्यामुळे चायनिज लोकांचे रशियात पर्यटन सर्वाधिक आहे. हे सुद्धा एक कारण आहे ज्यामुळे रशियात कोरोना पसरला गेला असा अंदाज वर्तवला जातो आहे.

वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. शाळा आणि कॉलेजच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन हा 30 एप्रिल पर्यंत असला तरी माझ्यामते तो पुढे ढकलण्यात येईल. कारण, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. सुरुवातीला इथे कोरोना जास्त पसरणार नाही असे वाटले पण, आता दिवसाला संख्या वाढतेय. इटली किंवा अमेरिका इतके प्रमाण नाही पण, दिवसाला हजारांची संख्या वाढणे हे कमीदेखील नाही.

अमृता पोटे, रशिया (Smolensk State Medical University)