छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय

छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय
छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय

न्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. ढोल-लेझीम व छत्रपती महाराजांच्या गर्जनांनी परिसर दुमदूमून गेला होता.

नवी दिल्लीमधील राजपथावर 26 जानेवारी रोजी रॅली काढली जाते अगदी त्याच प्रमाणे न्यूयॉर्कमध्ये रॅली काढण्यात आली होती. भारतीय संस्कृती व विविध देखावे, चित्ररथ, नृत्य सादर करण्यात आली. पुरुषांनी सलवार कुर्ता व फेटे घातले होते तर महिलांनी साडी परिधान करून ढोल-ताशांच्या ठेक्यावर लेझीम हातात घेऊन नृत्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा व ढोल-ताशांनी परिसरून दुमदुमून गेला होता. शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले झेंडे चौफेर फडफडत होते.

रथाच्या पुढील भागात शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह उभे असल्याची भूमिका युवकांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोशाखाद्वारे जिवंत केली. पाठीमागे राष्ट्रमाता जिजाऊ बाळ शिवबांना मार्गदर्शन करत असल्याचा प्रसंग अभिनायतून सादर करण्यात आला. या किर्ती रथाचे भारतीयांसह न्यूयॉर्कवासींनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. किर्ती रथासोबत अल्बनी (न्यूयॉर्क स्टेट) येथील 100हुन अधिक जणांनी ढोल-ताशा व लेझीम नृत्यातून महाराष्ट्रातील लोककला सादर केली. प्रचंड उत्साहातील हजारो भारतीय व अमेरिकन नागरिकांच्या जल्लोशात जगाची आर्थीक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू हा भाग भगवामय झाला होता. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, जिजाऊंची स्वराज्य संकल्पना व हिंदवी स्वराज्याचा इतिहासाबद्दल माहितीपत्रक सर्व उपस्थितांना वाटण्यात आली. न्यूयॉर्क परेड लाईफ या वृत्तपत्राने या कार्यक्रमाची दखल घेत 'बेस्ट रथ' म्हणतानाच शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाही मुळांशी जोडला आहे, असे नमूद केले.

मुख्यतः विद्यार्थी व युवकांच्या नेतृत्वाखाली छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क ही संस्था गेल्या 6 वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती, जिजाऊजयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंतीच्या माध्यामातून विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्कस्थित भारतीय दूतावासात शिवजयंतीचे आयोजन केले होते. फौंडेशनच्या विविध उपक्रमात या कार्यक्रमामुळे एक माणाचा तुरा खोवला गेला. महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांतील युवकयांच्या माध्यमातून अमेरिकेसह जगभरातील कार्य छत्रपती फौंडेशनचे कार्य विस्तारत आहे, ही प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटणारी व प्रेरणा देणारी शक्ती बनली आहे.

शिवाजी महाराजांची किर्ती, कर्तृत्व व विचारांचा प्रसार जगभर कारण्याच्या दिशेने छत्रपती फाऊंडेशन सतत काम करत आहे. किर्तीरथ त्याचा एक दुवा असून यापुढे युनायटेड नेशनमध्ये शिवजयंती साजरी करून जिजाऊंना अपेक्षित असलेल्या स्वराज्य/शिवराज्याचा विचार जगभर पोचवण्याचा प्रयत्त्न करणार आहे, असे संस्थापक स्वप्नील खेडेकर व अध्यक्ष विनोद झेंडे यांनी सांगितले. शिवरायांच्या कार्यास वाहून घेत लोककलेद्वारे व महानाटयांच्या माध्यामातून प्रसार करत आहे, असे अल्बनी ढोल ताशा पथकाचे संस्थापक अध्यक्ष कल्याण घुले यांनी म्हटले आहे. पथकातर्फे यावर्षी न्यूयॉर्क राज्याची राजधानी अल्बनी येथे शिवराज्यावर आधारित ऐतिहासिक नाट्य सादर केले होते.

संयुक्त चमूच्या अग्रभागी तिरंग्यासह न्यूयॉर्क स्टेट युवती अध्यक्ष अलिशा मर्चंट होत्या तर महिला वादक असलेल्या ढोल ताशा पथकाचे नेतृत्व शिल्पा घुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी छत्रपती फाऊंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख गौरव दळवी, संघटनप्रमुख रूपेश नाइक, न्यूयॉर्क स्टेट अध्यक्ष प्रशांत भूसारी, न्यूजर्सी स्टेट अध्यक्ष रोहन रायगुडे, न्यूयॉर्क स्टेट उपाध्यक्ष अभिनव देशमुख व न्यूयॉर्क स्टेट युवक अध्यक्ष ऋषिकेश माने व शरद कोट्टाकह यांनी प्रयत्न केले. फाऊंडेशनचे मार्गदर्शक किशोर गोरे व दिलीप म्हस्के यांनी दिशा दाखवली. ढोलवादकांचे नेतृत्व राजेंद्र गाडे व जगदीश सोळंकी तर ताशावादकांचे नेतृत्व संदीप जाधव व अनिल कुलकर्णी यांनी केले. पथक संचालनाची जबाबदारी भूषण पाटील यांच्यावर होती.

शिवछत्रपती किर्तीरथ हा 2018च्या न्यूयॉर्क परेडचा शो-स्टोपर ठरला आहे. जल्लोश ग्रुपचे प्रमुख मुकुंद खिस्ती व आर्याबागचे कल्याण तावरे यांसह अनेक संस्थांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. भारतातून प्रसिद्ध अभिनेत कमल हसन, अनुपम खेर, श्रृती हसन, क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फेडेरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्स या संस्थेतर्फे दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com