ब्लॉग : जर्मनीत मराठी ठिकवणारे ८८ वर्षांचे 'तरुण अजोबा'

जीवन करपे
Saturday, 14 September 2019

फ्रँकफर्ट : शरद कुमार कुलकर्णी ऊर्फ बाळ काका. १९५१मध्ये एमएससी पूर्ण केलं. बहरीन गाठलं. २ वर्षे बहरीनमध्ये काम केल्यावर इंग्लंडला नोकरीसाठी अर्ज केला. इंग्लंडमध्ये अमेरिकन सिव्हील सर्विसेसमध्ये नोकरी मिळाली.१९७२मध्ये अमेरिकन सरकारने त्यांची बदली जर्मनीला केली.

फ्रँकफर्ट : शरद कुमार कुलकर्णी ऊर्फ बाळ काका. १९५१मध्ये एमएससी पूर्ण केलं. भारतामध्ये फार काही स्कोप नसल्यामुळे बहरीन गाठलं. २ वर्षे बहरीनमध्ये काम केल्यावर इंग्लंडला नोकरीसाठी अर्ज केला. इंग्लंडमध्ये अमेरिकन सिव्हील सर्विसेसमध्ये नोकरी मिळाली. जवळपास १४ वर्षे इन्व्हेस्टिगेशन लॅबमध्ये काम केल्यानंतर १९७२मध्ये अमेरिकन सरकारने त्यांची बदली जर्मनीला केली आणि आता गेली ४७ वर्षे ते जर्मनीमध्ये राहत आहेत.

जर्मनी आणि मराठी कट्टा
आज मराठी कट्टा जर्मनीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त मी त्यांच्या घरी म्हणजे फ्रँकफर्ट शहाराबाहेरील एका गावामध्ये त्यांना पिकअप करायला गेलो. तेथे त्यांच्या पत्नी योहाना त्यांच्या सोबत होत्या. शरद कुमार कुलकर्णी ऊर्फ बाळ काका अस्सल पुणेरी स्वभावाप्रमाणे आमची वाट पाहत होते. गाडीत बसल्यावर आम्ही दोघे म्हणजे मी आणि अजित कोलते त्यांच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला. १८ मिनिटांमध्ये जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी आपली शिदोरी जमा केली. मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. पण, एक प्रश्न असा होता की, जर्मनीमध्ये न आवडणारी गोष्ट आणि आवडणारी गोष्ट कोणती? त्यांचं उत्तर असं होत की,  न आवडणारी गोष्ट म्हणजे नो सोशल लाईफ आणि आवडणारी गोष्ट म्हणजे मराठी कट्टा जर्मनी.

कसा होता जर्मनी?
जेव्हा जीपीएस सिस्टम नव्हते तेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग कसे करत होता? जर्मनीची लोकसंख्या तेथील पायाभूत सुविधा अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारले आणि ४० वर्षापूर्वी जर्मनी कसे होते याचे चित्र पुढे उभे राहिले. त्याकाळी असे, त्याकाळी तसे, असं म्हणणारा माणूस मला फार भावून गेला. खूप प्रश्न राहून गेले. आजच्या सोशल मीडिया म्हणजेच व्हॉटसअप, फेसबुक रहीत ते २० मिनिट खूप सुंदर अनुभव देऊन गेले. शरद कुमार कुलकर्णी यांना भेटून खूप छान वाटले. आजच्या सोशल मीडियाच्या गर्दीत बाळ काकांसारखा नित्यनेमाने पुस्तकं वाचन करणारा, पत्र लिहिणारा माणूस कुठेतरी हरवून गेला की काय असेही मनात येऊन जातं. अजित रानडेंनी मला आणि अजित कोलते याला या थोर व्यक्तीस पिकअप करायला पाठवले. खूप धन्यवाद.

जर्मनीत राठी टिकवली
आज बाळा काकांचं वय ८८ आहे. त्यातली ६३ वर्षे भारताबाहेर काढली आणि जर्मनीत तब्बल ४७ वर्षे. भारतीय संगीताचं शिक्षण देण्यासाठी फ्रँकफर्टमध्ये जर्मनीत जी संस्था सुरू झाली. ती सुरू करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता आणि फक्त भारतीय मंडळींचेच नाही तर कित्येक जर्मन लोकांचे ते संगीत गुरू आहेत. वयोमानानुसार काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय संगीताचं शिक्षण देणं जरी थांबवलं असलं तरी, वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते नेहमी हजेरी लावत असतात. साधारण ६०-७० वर्षांपूर्वी ही जितकी मराठी मंडळी युरोपात किंवा जर्मनीत आली आणि त्यांनी जर्मन संस्कृतीशी मेळ साधताना, आपली संस्कृती इथे कशी टिकवून ठेवली याची कल्पना येते. दिवसरात्र सोशल मीडियामध्ये जगणाऱ्या आणि पुणे-मुंबईत देशात काय होतंय याविषयी सतत अपडेट होणाऱ्यांना लोकांसाठी हे अवघड आहे.

म्हणून, ज्येष्ठांचा सत्कार 
डॉक्टर देवल, बाळ काका, जर्मनीत राहणारी अजून काही मराठी मंडळी. त्या वेळी एकमेकांना पत्र पाठवून ठरवायचे आणि वर्षांतून एकदा कुठेना कुठे जर्मनीमध्ये मराठी संमेलन भरवायचे. असच एक संमेलन १९८६ मध्ये ओफेनबाखला भरलं होतं. आज जर्मनीची भारताविषयी जी काही चांगली प्रतिमा आहे. त्यामध्ये जर्मनीत आलेल्या पहिल्या पिढीतील काही चांगल्या लोकांच नक्कीच मोठं योगदान आहे. आपण, आपल्याला जमेल त्या पद्धतीने, छोट्या प्रमाणात का होईना, साजरा केलेल्या या उत्सवामध्ये म्हणून,  जेष्ठांचा सत्कार केला. शरद कुमार कुलकर्णी ऊर्फ बाळ काका यांना मनापासून धन्यवाद.

आणखी बातम्या वाचा

उदयनराजे भाजपमध्ये; फायदा कोणाचा? तोटा कोणाचा?

भाजपच्या सत्तालालसेला शिवसेनेचा खो!

साताऱ्यात दोन राजांची ताकद विभागणार, पण कशी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jeevan karpe writes blog about germany sharad kulkarni frankfurt