मराठी गायक नंदेश उमप यांच्या गायनाने भारवले मॉरिशसचे मराठी रसिक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 January 2019

नंदेश उमप यांनी आपल्या तेजस्वी व भारदार आवाजात महाराष्ट्र गीताची सुरुवात करताच सभागृहातील सगळे प्रेक्षक महाराष्ट्राच्या सन्मानार्थ उभे राहून एकच सुराने गीत गायला लागले. उत्स्फुर्तेपणे प्रेक्षकांना मोठ्या आवाजात सुरात सूर मिळवून गात असताना पाहून नंदेश एकदम भारावून गेले.

मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे लोकप्रिय मराठी गायक नंदेश उमप मुख्य पाहुणे तसेच मुख्य निर्णायक म्हणून उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे तबला वादक पराग कोळी आणि सुदर्शन उपस्थित होते. स्पर्धेपुर्वी मॉरिशस गणराज्याचे उपराष्ट्रपती बॉरलेन वायापुरी आणि कला व संस्कृती मंत्री पृथ्वीराजसिंह रूपन यांनी उपस्थितांची आवर्जून भेट घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या 

'स्वरगंध' या गीतस्पर्धेसाठी मॉरिशसच्या २३ कलावंतांनी भाग घेतला होता त्यापैकी एकूण आठ कलावंतांची निवड झाली होती. वादळी वातावरण असले तरी या कलावंतांनी  न माघार घेता खुबीने आपले गायन प्रस्तुत केले. यामध्ये महादू यांस प्रथम, दिनेश यांस द्वितिय, आणि निष्ठा कहानक यांस तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे ३०,००० रु.  २०,००० रु  १०,००० रु रक्कमेसह ढाल, शिल्ड, तसेच मॉरिशस व मुंबईच्या हॉटेलमध्ये कमीतकमी दोन दिवसांचा मोफत मुक्काम असे पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना  तंत्रज्ञान, संवाद आणि नवलकल्पना मंत्र योगिदा सॉमिनादेन यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. त्यावेळेस नंदेश उमप आणि पराग कोळी यांना शाल आणि स्मरिणका देऊन त्यांचे अभिनंदन केले आले.

कार्यक्रमाच्या शेवटी नंदेश उमप यांनी आपल्या तेजस्वी व भारदार आवाजात महाराष्ट्र गीताची सुरुवात करताच सभागृहातील सगळे प्रेक्षक महाराष्ट्राच्या सन्मानार्थ उभे राहून एकच सुराने गीत गायला लागले. उत्स्फुर्तेपणे प्रेक्षकांना मोठ्या आवाजात सुरात सूर मिळवून गात असताना पाहून नंदेश एकदम भारावून गेले.

अर्जुन पुतलाजी  यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. रोजबेल सुगर स्टेटचे अध्यक्ष दिनेश बाबाजी, मॉरिशस स्टेट बँकचे अध्यक्ष जयराज सोनू, पारस कहानक तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियन हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi singer Nandesh Umaps singing appreciated by moraceous marathi Audience