esakal | OMPEGचा प्रथम वर्धापनदिन रंगणार लॉर्डसवर

बोलून बातमी शोधा

ompeg london
OMPEGचा प्रथम वर्धापनदिन रंगणार लॉर्डसवर
sakal_logo
By
केदार लेले (लंडन)

यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group (OMPEG) ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था गेल्या वर्षी लंडनमध्ये स्थापन केली. OMPEG या संस्थेचा उद्घाटन सोहळा १० एप्रिल २०१६ रोजी लंडन येथिल सडबरी गोल्फ क्लबवर संपन्न झाला होता.

OMPEG या संस्थेचा पहिला वर्धापनदिन आज (29 एप्रिल) लॉर्डसवर साजरा करण्यात येत आहे. सदर लेखात जाणून घेऊयात प्रतिष्ठित लॉर्डसवर होणाऱ्या OMPEGच्या सोहळ्याबद्दल!

OMPEGच्या सोहळ्यासाठी प्रतिष्ठित लॉर्डसचे स्थळ निश्चित!
जसं मुंबई आणि ताज चे एक अतूट नातं आहे, तसचं काहीसं लंडन आणि लॉर्डस क्रिकेट मैदानाचं आहे. OMPEGच्या पहिल्या वर्धापन सोहळ्यासाठी लॉर्डस हेच सगळ्यात समर्पक स्थळ आहे. माजी क्रिकेटपटू व आर्थिक सल्लागार, श्री मधु गुप्ते मेरिलबोन क्रिकेट क्लबचे सदस्य असल्यामुळे पहिला वर्धापन दिन आणि चर्चासत्रासाठी हे प्रतिष्ठित स्थळ निश्चित करण्यात त्यांचा मोठा हातभार लाभला!

OMPEGची वाटचाल अभिमानास्पद
अस्तित्वापासून एका वर्षाच्या कालावधीत OMPEG शी संबंधित सदस्यांमध्ये आपुलकीची जाणीव आणि एकत्र येऊन खूप काही मिळवावे असा मराठी बाणा दिसून येत आहे. ज्यामुळे अधिकाधिक उद्योजक आणि व्यावसायिक OMPEG मध्ये सहभागी व्हायला पुढे आले आहेत.

OMPEGचा मुख्य उद्देश
OMPEG या संस्थेचे प्रमुख उद्देश हे युकेमधील हजारोने पसरलेल्या महाराष्ट्रीयन व्यवसायिक व उद्योजकांना एकत्र आणून नवीन संधी व प्रोत्साहन उपलब्ध करुन देणे तसेच तरुण उद्योजकांना मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे.

कार्यक्रमाची जय्यत तयारी!
OMPEGच्या संस्थापक सदस्यांबरोबर, इतर सदस्यांनी पहिल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या संयोजन, संकल्पना आणि आयोजनास मदत केली. लोकांमधील सुसूत्रता, सर्जनशीलता, समारंभ व्यवस्थापन यामधील तज्ञ स्वयंसेवकांचे अचूक मिश्रण होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी कलाकार मंडळी गेले दोन महिने अविरत परिश्रम करत आहेत.

सर्वात महत्त्वाचा घटक होता तो प्रयोजकांचा जी त्यांनी सढळपणाने मदत केली.

प्लॅटिनम

 • श्री. अक्षय शहा - एस अकाऊंट्स अँड टॅक्स
 • श्री. देवांग गांधी – डेटामॅटिक्स
 • श्री. जय तहसीलदार - मर्क्युरिअस आयटी
 • सौ. माधवी आमडेकर आणि श्री. रवी गाडगीळ - कोलंबस इंटरनॅशनल
 • श्री. मनोज कारखानिस - डेसिमल फॅक्टर्स

गोल्ड

 • श्री. अनिरुद्ध कापरेकर - बॅनियन ट्री आन्सर्स
 • श्री. राहुल इथापे - नक्षी. कॉम
 • श्री. सुजय सोहनी आणि श्री. सुबोध जोशी - श्रीकृष्ण वडा पाव

सिल्व्हर

 • श्री. अभय जोशी - एलिफंट कनेक्ट
 • सौ. मंजिरी गोखले जोशी – मायाकेअर
 • श्री. दिपेश शहा – उकनोव्हा
 • सौ. मीना पंडितराव - मिल्स फ्लोरा
 • श्री. नयन गाला – एल.के. हाऊसिंग
 • श्री. प्रसाद कुलकर्णी - पंडित युके
 • श्री. राहुल घोलप - बेस्ट चॉईस ट्रॅव्हल्स
 • श्री. रंजिता दळवी / शिवानी प्रभुणे - दळवी वेल्थ मॅनेजमेंट
 • सौ. रेणुका फडके - व्ही आर मॉर्टगेज सोल्युशन्स
 • श्री. सचिन कदम - अर्घ्या एंटरप्राईझेस
 • श्री. सौजन्य – ट्रॅफिस
 • सौ. श्वेता मंत्री - फॅशन हेरिटेज / बानी