OMPEG शोकेस 2017

केदार लेले (लंडन)
Wednesday, 8 March 2017

28 जानेवारी 2017 रोजी महाराष्ट्र मंडळ लंडन येथे आयोजित केलेल्या OMPEG शोकेस मध्ये 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन उद्योगपतीनी, 30 पेक्षा जास्त उद्योगांच्या संकल्पना सादर केल्या.

कार्यक्रमात केक बनवणे, मसाले उत्पादन, सौंदर्य प्रसाधन, फुले निर्यात आणि आरोग्य सेवा पासून माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक, उद्योग प्रशिक्षण, सहली आणि उड्डाण संस्था याचे विविध मिश्रण होते. OMPEG मध्ये 18 वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून सेवा निवृत्त वृद्धांनी सहभाग घेतला. उपस्थितांना नविन उद्योगांसाठी मार्गदर्शन केले गेले.

28 जानेवारी 2017 रोजी महाराष्ट्र मंडळ लंडन येथे आयोजित केलेल्या OMPEG शोकेस मध्ये 100 पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन उद्योगपतीनी, 30 पेक्षा जास्त उद्योगांच्या संकल्पना सादर केल्या.

कार्यक्रमात केक बनवणे, मसाले उत्पादन, सौंदर्य प्रसाधन, फुले निर्यात आणि आरोग्य सेवा पासून माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक, उद्योग प्रशिक्षण, सहली आणि उड्डाण संस्था याचे विविध मिश्रण होते. OMPEG मध्ये 18 वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून सेवा निवृत्त वृद्धांनी सहभाग घेतला. उपस्थितांना नविन उद्योगांसाठी मार्गदर्शन केले गेले.

OMPEG च्या सत्रात अनेक महिला व पुरुषांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्रात अनेक वर्षे वास्तव केल्याने मराठी संस्कृतीत एकरूप आणि एकनिष्ठ झालेल्या अनेक अमराठी उद्योजकांनी सुद्धा सहभाग घेतला. या अविस्मरणीय संध्याकाळी, प्रतिष्ठीत उद्योजकांनी त्यांच्या विविधांगी अनुभवांची देवाण-घेवाण केली. प्रथमतःच स्वतःचा उद्योग उभारण्याच्या निर्णयापासून ते आर्थिक उभारणी, मार्केटिंग, सेवा उत्पादन पूर्तता आणि उद्योगाची वाढ यासारख्या विविध पैलूंवर कशी कसून तयारी करायची यावर सुद्धा चर्चा झाली.

कार्यक्रमाचे आयोजन युके स्थित नेटवर्किंग संस्था महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था OMPEG (Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group) ने खासकरून महाराष्ट्रीयन समाजामध्ये उद्योजकता फुलवावी याकरिता केले होते.

OMPEG संस्थेवर अनेक माननियांचा सक्रिय सहभाग    
OMPEG या संस्थेचे श्री. दिलीप आमडेकर, श्री. रविंद्र गाडगीळ, श्रीमती मंजिरी गोखले जोशी, श्री. अनिरुद्ध कापरेकर, श्री. सुशील रापतवार, श्री. जय तहसीलदार व श्री. अवि टिल्लू सभासद आहेत.

OMPEG ला सुप्रसिद्ध उद्योजक श्री. प्रताप शिर्के (B. G. Shirke Constructions व विविध आंतरराष्ट्रिय कंपन्यांचे संचालक) आणि श्री. धनंजय मुंगळे (आर्थिक सल्लागार व विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे संचालक) तसेच उपस्थित मान्यवरांबरोबरच स्थानिक व्यवसायिक व उद्योजक - डॉ. महादेव भिडे (IVF specialist and entrepreneur), मनोज वसईकर (Award winning chef and restauranteur)  यासारख्या सल्लागारांचा पाठींबा आहे.

युके मधील विविध शहरातून आलेल्या अनेक महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांनी या कार्यक्रमास हजर राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व OMPEG च्या पुढील कार्यक्रमांसाठी मौलिक अभिप्राय आणि सुचना दिल्या, तसेच उस्फुर्त सहभागाचे आश्वासन देखील दिले.

OMPEGचे उद्देश
OMPEG या संस्थेचे प्रमुख उद्येश्य हे युकेमधील हजारोने पसरलेल्या महाराष्ट्रीयन व्यवसायिक व उद्योजकांना एकत्र आणून त्यांना प्रोत्साहन व नविन संधी उपलब्ध करुन देणे तसेच तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. OMPEG ने महाराष्ट्रीयन समाजामध्ये उद्योजकता रुजवण्यासाठी उद्योगांशी निगडीत विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात योगदान दिले आहे

OMPEG चे आगामी कार्यक्रम
OMPEG या संस्थेचा पहिला वर्धापन दिन एप्रिलच्या अखेरीस आयोजण्याचे ठरले आहे. तसेच ता. ८ मार्च रोजी एक वेब कॉन्फरंसचे आयोजन करण्यात आले आहे.  

महाराष्ट्र मंडळ लंडन आणि इतर महाराष्ट्रीयन संस्थांनी एकत्रितपणे येऊन 02 जून ते 04 जून 2017 दरम्यान आयोजित होणाऱ्या 'लंडन मराठी संमेलन 2017' दरम्यान OMPEG ने जागतिक मराठी उद्योजक (ग्लोबल मराठी एंटरप्रुनर्स) 2017 च्या पुरस्काराची घोषणा केली आहे या पुरस्कारासाठी जगभरातून महाराष्ट्रीयन उद्योजकांची नामांकने आमंत्रित करण्यात आली आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क-
mail@ompeg.org.uk


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ompeg london