लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'

London Marathi Sammelan
London Marathi Sammelan

लंडन - लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस-2017) निमित्ताने येथे महाराष्ट्रीयन उद्योजक परिषद आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठीच्या एकाहून एक सरस अशा बहारदार कार्यक्रमांनी तीन दिवस चाललेल्या संमेलनाची उत्साहात सांगता झाली.

महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात
शुक्रवारी (दि. 2 जून रोजी), १ कॅनडा स्क्वेयर, कॅनरी वॉर्फ, येथे 'एलएमएस'ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली होती, यामध्ये 150हून अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित होते. दिलीप आमडेकर, मनोज कारखानीस आणि सुशील रापतवार यांनी या परिषदेचे संचालन केले.

जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धेत उद्योजकांना पारितोषिके
जागतिक महाराष्ट्रीयन उद्योजक स्पर्धेत खालील उद्योजकांना पारितोषिके देण्यात आली:
एस्टॅब्लिश श्रेणी - गोल्ड पारितोषिक विजेते: उमेश दाशरथी, सिल्वर: संजीव नाबर, ब्राँझ: श्रीकृष्ण गांगुर्डे, अमरेंद्र कुलकर्णी 

स्टार्ट-उप श्रेणीमध्ये - गोल्ड: रोहन आणि प्रियल नागरे, सिल्वर: विलास शिंदे, ब्राँझ: प्रसाद भिडे.

या स्पर्धेचे समन्वय केले होते सौ श्वेता गानू ह्यांनी. ह्या स्पर्धेत १०० होऊन अधिक उद्योजकांनी भाग घेतला होता ज्याच्या जजींग पॅनल वर होते: शंतनू भडकमकर, श्रीराम दांडेकर, चंद्रशेखर वझे, डॉ नितीन देसाई आणि रवींद्र प्रभुदेसाई. 

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या च्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त दि. 3 व 4 जून रोजी येथील वॉटफर्ड येथील वॉटफर्ड कलोझियम थिएटरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपली कला सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, सयाजी शिंदे, भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. साहित्य संमलेनाचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांनी अचार्य अत्रे यांचा लंडनशी असलेल्या संबंधाबाबत विनोद सांगून उपस्थितांमध्ये हषा पिकवला.

सांस्कृतिक कार्यक्रम
अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने विविध गाण्यांवर नृत्य सादर करत वाहवा मिळवली. शिवाय, अनेकांना आपल्या नृत्यावर ठेका धरायला लावला. स्मिता साळुंके व मानसी महाजन यांनी 'बाई वाड्यावर या...' लावणीवर बहारदार नृत्य सादर केले. गायक हृषिकेश रानडे, आर्या आंबेकर, नंदेश उमाप यांनी एकाहून एक अशी दर्जदार गाणी सादर केली. योगेश जोशी यांनी पोवाडा सादर केला. लंडनवासीयांनी या कला-गुणांना मनापासून दाद देत थिएटरच्या मोकळ्या जागेत नृत्याचा आनंद लुटला. यावेळी परदेशी महिलांनीही ठेका धरला होता. समिर चौगुले यांच्या 'बुलेट ट्रेन' या कार्यक्रमाने उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. 

बाराखडी - मराठी शिकवण्याचे महत्व
नव्या पिढीला मराठी शिकवण्याचे महत्व एका छोट्या नाट्यछटेने दाखविले गेले. भारतीय भाषा संघाचे दिलीप पेडणेकर, संतोष पारकर आणि पंकज अंधारे यांनी येणाऱ्या पिढीला मराठी शिकवण्याचे महत्व एका छोट्या नाट्यछटेने दाखविले ज्याच्यात लहान मुलांनी अगदी सहजपणे क, ख, ग, घ, न अशी सर्व बाराखडी अगदी व्यवस्थित पणे म्हणून दाखविली.

फॅशन शो
लंडन मराठी संमेलना (एलएमएस-2017) मध्ये पहिल्यांदाच फॅशन शो करण्यात आला ज्याच्या मध्ये २० लोकल मॉडेल्स ने भाग घेतला होता.  डॉ महादेव भिडेंच्या प्रेरणेने आणि प्रियांका कानविंदे, साईश शेटे, सौरभ वळसंकर यांच्या अथक परिश्रमाने हा फॅशन शो अगदी थाटा माटात पार पडला. याच्यात भाग घेणारे कलाकार होते

कोरिओग्राफर - प्रियांका कानविंदे, सईश शेटे 
आयोजक – डॉ. महादेव भिडेआणि सौरभ वळसंगकर
ध्वनी सहाय्य : मिलिंद देशमुख
मॉडेल : डॉ. अर्चना तापुरीया, विहंग इंगळे, योगेश चौधरी, शर्वरी चिडगुपकर, नवनीत रविशंकर, दीपा सराफ देशपांडे, सचिन देशपांडे, प्रियांका दवे, तन्वी वाईंगणकर, गायत्री सोनावणे, सौरभ सोनावणे, दिना सेला, मीनाक्षी परांजपे, भावना लोटलीकर, रश्मी लखपते तेली, विशाल तेली, लुलजेता गोका, निका खालादकर

मराठी पदार्थांची मेजवानी
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतीक कार्यक्रमाबरोबर मराठी पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. 'एलएमएस'चे संमेलन यशस्वी करण्यामागे अनेकांचे सहकार्य व हातभार लागल्याचे सांगत अध्यक्ष सुशील रापतवार यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्य समिती
सुशील रापतवार (आवाहक), वैशाली मंत्री (उप आवाहक), डॉ गोविंद काणेगावकर, डॉ महादेव भिडे, अनिल नेने, डॉ उत्तम शिराळकर, शार्दुल कुळकर्णी, आदित्य काशीकर, प्रणोती पाटील जाधव

लंडन मराठी संमेलनाचे शिलेदार
लंडन मराठी संमेलना (एलएमएस-2017) चे शिलेदार ज्यांनी संमेलनासाठी खूप मेहनत घेतली आणि संमेलन यशस्वीरित्या पार पाडले त्यात प्रामुख्याने खालील सहकाऱ्यांची नावे आवर्जून घेतली पाहिजे: अर्निका परांजपे (अटकेपार - स्मरणिका संपादिका), निखिल देशपांडे, अजिंक्य भावे, विजेंद्र इंगळे, अंजली शेगुणशी, निका वळसनकर, मयूर चांदेकर, अद्वैत जोशी,चेतन मंत्री, सौरभ वळसनकर, चेतन हरफळे, अरुणा देशमुख, निवेदिता सुकळीकर, संतोष पारकर, अभिजित देशपांडे, हर्षवर्धन सोमण, मिलिंद देशमुख

प्रायोजक
लंडन मराठी संमेलनाचे मुख्य प्रायोजक होते भारत विकास ग्रुप, स्टेट बँक ऑफ इंडिया, लोढा ग्रुप, पितांबरी, श्री दीपलक्ष्मी, वेस्टबरी आणि लॉरबीस तसेच ट्रॅव्हल पार्टनर - मँगो हॉलिडेस
केटरिंग पार्टनर होते - रोशनीस फाईन डायनिंग

'सकाळ' व 'ई सकाळ'ला धन्यवाद!
'एलएमएस'चे वार्तांकन थेट लंडनमध्ये येऊन ई सकाळ व सकाळच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱयांनी व्यासपिठावरून सकाळचे आभार मानले. उपस्थित नागरिकांनी ई सकाळवरील लाईव्ह बातमी मोबाईलच्या माध्यमातून दाखवत टाळ्या वाजविल्या. यावेळी अनेकांनी सकाळच्या प्रतिनिधीची भेट घेत लंडनमध्ये राहून आम्हाला महाराष्ट्रासह येथील बातम्या सर्वप्रथम ई सकाळवरून वाचायला मिळत असल्याचे आवर्जुन सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com