esakal | डॉक्टरच्या अंदाजानुसार 60 टक्के तुर्की लोकांना 'करोना'चा संसर्ग!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जेंव्हा करोना व्हायरस वेगाने तुर्कस्तानच्या सीमेवरील देशांत फोफावत होता. तेंव्हा राष्ट्राध्यक्ष रेचेप्प ताइप्प एरेडोआन [१] व त्यांचे मंत्रिमंडळ सत्यपरिस्थिती नाकारून स्वत:चीच फसवणूक  करूने घेत बसले होते. जरी, तुर्कस्तानला भेट देऊन आलेल्या अनेक प्रवाशांनी आपल्याला तुर्कस्तानमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचा पुरावा मिळाला असल्याचे जाहीर केले असले तरी, तुर्कस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या देशात करोनाची लागण कोणालाही न झाल्याचे ठामपणे व जाहीरपणे सांगितले.

डॉक्टरच्या अंदाजानुसार 60 टक्के तुर्की लोकांना 'करोना'चा संसर्ग!

sakal_logo
By
मायकेल रुबिन

Coronavirus मराठी अनुवाद - सुधीर काळे (sbkay@hotmail.com)
जेंव्हा करोना व्हायरस वेगाने तुर्कस्तानच्या सीमेवरील देशांत फोफावत होता. तेंव्हा राष्ट्राध्यक्ष रेचेप्प ताइप्प एरेडोआन [१] व त्यांचे मंत्रिमंडळ सत्यपरिस्थिती नाकारून स्वत:चीच फसवणूक  करूने घेत बसले होते. जरी, तुर्कस्तानला भेट देऊन आलेल्या अनेक प्रवाशांनी आपल्याला तुर्कस्तानमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचा पुरावा मिळाला असल्याचे जाहीर केले असले तरी, तुर्कस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या देशात करोनाची लागण कोणालाही न झाल्याचे ठामपणे व जाहीरपणे सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिट्ट्सबर्ग विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉ. अर्गिनको च्यिल्डिरिम* या लहान मुलांच्या हृदयविकाराच्या तसेच फुफ्फुसांच्या विकाराच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी एका सुरेख निबंधातून करोना विकाराच्या निदानासाठी एक परिणामकारक उपकरण बनविल्याच्या तुर्कस्तान सरकारच्या चुकीच्या दाव्याबाबत व त्या दाव्यातील खोटेपणा बद्दल परिस्थिती जगासमोर आणली आहे. (*या नांवाचा उच्चार कसा करतात ते मला नक्की माहीत नाही.)

करोना सारखा संसर्गजन्य रोग तुर्कस्तानमध्ये प्रवेश न करता पुढे का गेला असावा या दाव्यावर जेंव्हां स्थानीय व तज्ज्ञांनी अविश्वास दाखविला तेंव्हा त्याला तोंड देण्यासाठी तुर्की सरकारच्या अधिकाऱ्यांनी दुहेरी मार्ग अवलंबिला.  चीनने जसे आपले गुपित साऱ्याजगाला आपणहून सांगणाऱ्या चिनी नागरिकांना कैदेत टाकले. तिच पद्धत अनुसरून तुर्की अधिकाऱ्यांनी  सुद्धा अशी ‘भांडेफोड’ करणाऱ्या आपल्या अधिकऱ्यांना कैदेत टाकले. पण, केवळ सत्याच्या गळचेपी पुरतेच न थांबता त्यांनी सरकारच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असलेल्या आपल्या तुर्की प्रसार माध्यमांच्या मंडळांच्या मदतीने असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला की, तुर्कीजनुकांमळे (genes) सर्व तुर्की वंशाच्या (Turcik) [२] लोकांना करोना विरुद्ध परिणामकारक अशी एक खास रोग प्रतिकारक शक्ती लाभली आहे व त्यामुळेच या रोगाने तुर्कस्तानमध्ये प्रवेश केला नाही. एरेडोआनसह अनेक तुर्की लोकांना आपल्या या इस्लामी व तुर्की श्रेष्ठतेबाबत अभिमान वाटत असेल पण त्यांच्या ’शास्त्र’ याविषया बाबतच्या अशा अज्ञानामुळे त्यांनी डार्विनच्या सिद्धांताची[३] सत्यता जगाला पुन्हा एकदा दर्शविली होती काय? पण, करोना बद्दलचे असले असत्य पसरविण्यासाठी आणि ८ कोटी तुर्की जनतेच्या जिवाबरोबर खेळण्यासाठी एरेडोआन का प्रेरित झाले असावेत?

एरेडोआन यांच्या उद्धटपणाचे आणि त्यांच्या अज्ञानाचे अतीशय धोकादायक असे मिश्रण या मागील कारणाचा एक भाग असू शकेल. एरेडोआन यांचा उद्धटपणा त्यांच्या विरुद्ध टीका करणाऱ्यांविरुद्धच्या क्रोधातून वारंवार दिसून आलेला आहेच. तुर्कस्तानच्या न्यायविषयक मंत्रालयानुसार तुर्की पोलिसांनी २०१४ ते २०१७ दरम्यान, दर वर्षी एरेडोआन यांच्यावर किंवा त्यांच्या भ्रष्टाचारावर टीका करणाऱ्याविरुद्ध सरासरी ४५०० लोकांवर खटले घातले होते. त्यात मायकेल रुबिन यांचाही समावेश आहे [४]. २०१८साली एरेडोआन सरकाराने २६हजार नवे खटले दाखल केले. जसजशी तुर्की अर्थव्यवस्थेची हलाखीची स्थिती उघड होऊ लागली तसतशी एरेडोआन यांनी वाढत्या टीकेविरुद्ध खूप जोरदार हालचाली सुरु करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केलेला दिसला. एरेडोआन यांचे अज्ञानही आता गुपित राहिलेले नाहीं कारण पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर त्यांनी केलेला हल्लाकट-कारस्थानांविरुद्धच आहे असेच सर्वांना पटवले जात होते आणि या काल्पनिक कट-कारस्थानांचे हास्यास्पद आरोप कुठ कुठल्या घटनांबद्दल केले जात होते? तर ज्यू लोकांचे त्यांच्या वस्तू दुरूनच एका जागेवरून दुसऱ्या जागी जादूच्या सहाय्याने हलविण्याबाबतचे कौशल्यांबद्दल (telekinesis) किंवा नित्यने एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या हालचालींना इस्रायलची ’हेरगिरी’ म्हणून संबोधण्याबद्दल! आहे की नाहीं? उद्या हद्दपार केलेल्या फतुल्ला गुलेन या धर्मवेत्त्यावर तुर्की सरकारने त्यांचे अनुयायीच या करोना रोगाचा प्रसार करत आहेत असे आरोप केले तर त्यात आश्चर्य नकोच वाटायला. 

जनतेला असे प्रवृत्त करण्या मागे सत्ता भ्रष्ट होण्याची भीती हेच मुख्य कारण असावे. तुर्कस्तानच्या जनतेमधील लोकसंख्या शास्त्रानुसार होत असलेला बदल लक्षणीय दिसून येऊ लागला आहे. हा बदल एरेडोआन यांच्या बाजूने होत आहे कारण तुर्कस्तानची आर्थिक स्थिती घसरत असताना मध्य तुर्कस्तानच्या अनातो लियाच्या परिसरात राहाणाऱ्या पुराणमतवादी लोकांची संख्या ’तुर्कस्तान युरोपचा भाग व्हावा’ अशी इच्छा असणाऱ्या इस्तंबूल व भूमध्य समुद्राच्या किनारपट्टी परिसरातील लोकांच्या तूलनेने वाढत आहे. २०१० साली एरेडोआन यांनी जनतेला आश्वासन दिले होते की तुर्कस्तानच्या शत सांवत्सरिक वर्षी म्हणजेच २०२३ साली तुर्कस्तानची गणना जगातील दहा सर्वोच्च अर्थव्यवस्थांमध्ये होईल. पण, सद्य परिस्थिती अशी आहे की करोनाचा प्रभाव जमेत धरला नाहीं तरी तुर्कस्तानची गणना जगातील सर्वोच्च २० अर्थव्यवस्थांमध्येही जेमतेम होईल. करोनाचा परिणाम तुर्कस्तानची ही आर्थिक स्थितीआणखीच खिळखिळी करेल कारण भ्रष्टाचार. आप्तांच्या बाजूने केलेली व शिलेबाजी, उद्योगधंद्यांत केलेली राजकीय लुडबूड व सर्वसाधारणपणे अंदाधुंदीत चाललेला राज्य कारभार यांमुळे तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे.

जसजशी तुर्कस्तानची अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे तसतसे तिच्यावरील अरिष्ट टाळण्यासाठी आवश्यक असलेले उपायांची परिणामकारकता ही कमी-कमी होत चाललेली आहे. सायप्रसच्या नैसर्गिक वायूची चोरी करणे हा अशाच डावपेचांच एक भाग होता [५] पण या उद्देशाच्या पूर्ततेसाठी तेलाच्या स्रोतांचे समन्वेषण करणारी तुर्की जहाजे जरी या प्रयत्नांत यशस्वी झालीच तरी हा नैसर्गिक वायू बाजारात आणायला अनेक वर्षे लागतील!

एरेडोआन यांना सर्वांत जास्त भीती जर कशाची वाटत असेल तर ती आहे तुर्कस्तानचा पर्यटन व्यवसाय कोसळून पडण्याची. २०१८साली पर्यटन व्यवसायाने तुर्कस्तानला ३०अब्ज [६]डॉलर्स (३० बिलियन)मिळवून दिले होते. एक वर्षापूर्वी एरेडोआन यांनी आपल्या देशवासियांना आता पेक्षा २० टक्क्याहून जास्त म्हणजेच ५ कोटी पर्यटक तुर्कस्तानला भेट देतील असे आश्वासन दिले होते. या गोंधळात तुर्कस्तानने १२अब्ज डॉलर्स खर्चून इस्तंबूल विमानतळाला जगातील सर्वात मोठे विमानतळ बनविण्याचा निर्णय घेतला होता. असेही म्हटले जाते की, या प्रकल्पात एरेडोआन यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणावर आपले पैसेगुंतविले होते.  

एरेडोआन यांनी करोनाबद्दलच्या अहवालांच्या उल्लेखांना मुद्दामच कमी महत्व दिले होते असे दिसते कारण त्यांना पर्यटकांकडून तुर्कस्तानच्या तिजोरीत येणारे डॉलर्स असेच खळखळत येत राहायला हवे होते. या उद्देशाने त्यांनी रशियन, युरोपियन व अमेरिकन लोकांनाच फक्त ’बुद्दू’च बनविले असे नाहीं तर ते त्यांच्या जिवाशीही खेळले आहेत. तुर्कस्तानच्या दुर्दैवाने आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की याची सर्वांत मोठी किंमत तुर्कस्तानच्या जनतेलाच भरावी लागणार आहे. कारण तुर्कस्तान आता करोना़चा या पुढचा केंद्र बिंदू बनू लागला आहे. एका तुर्की डॉक्टर ने केलेल्या अंदाजानुसार ६० टक्के तुर्की जनतेला करोना रोगाची लागण होण्याची शक्यता असून एरेडोआन हे मुद्दामच या रोगाची जनतेमधील तपासणी हवी तितकी वेगाने होऊ देत नाही आहेत. कारण, असे करून करोनाच्या अनर्थाची लागण जी चौफेर पसरली आहे तिची सत्यता जगाला कळून याची दक्षता ते घेत आहेत. मृत्यू तर टाळता येणार नव्हतेच पण एरेडोआन यांच्या अप्रामाणिकपणामुळे त्यांच्याच देशातील हजारो नागरिक नाहक पणे मृत्यूच्या दाढेखाली भरडले जाणार आहेत. (सध्याच्या अहवालात असे मृत्यू फक्त डझनभरच आहेत, असे जाहीर केले गेलेले आहे.)

या लेखाचे मूळ लेखक मायकेल रुबिन हे अमेरिकन एन्टरप्राईज इन्स्टिट्यूट या संस्थेत रेसिडेंटस्कॉलर म्हणून काम करत असून त्यांच्याशी ट्विटरच्या@mrubin1971या ’हॅन्डल’वरसंपर्कसाधतायेईल.

टिपा -
[१]Recep Tayip Erdogan is pronounced as रेचेप्प ताइप्प एरेडोआन 
त्यांचा थोडक्यात परिचय पुढे दिलेला आहे. १९५४च्या फेब्रुवारीमध्ये जन्मलेले एरेडोआन एक तुर्की राजकीय नेते असून ते सध्या त्यादेशाचे १२वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्याआधी ते ११ वर्षे तुर्कस्तानच्या पंतप्रधान पदावर होते. 
२०१७ साली एक सार्वमत घेऊन त्यांनी सांसदीय लोकशाहीच्या ऐवजी कार्यकारी अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची मुहूर्तमेढ केली व एका अतीसनातनी पक्षाबरोबर युती करून ते सत्तेवर आले. सत्तेवर आल्यापासून ते घसरणारे तुर्कीचलन (लिरा) व कर्जाचा वाढता डोंगर या समस्यांना तोंड देण्यात गुंतले आहेत व त्यात त्यांची लोकप्रियता सुद्धा ओसरली आहे व त्यामुळे २०१९ सालच्या स्थानीय निवडणुकांत त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले आहे.
[२] सध्या जगात अझरबैझान, कझाकस्तान, किर्गिझिस्तान, तुर्क्मेनिस्तान, तुर्कस्तान आणि उझबेकिस्तान हे सहा तुर्कीवंशाचे (Turkic) देश आहेत. 
[३] डार्विनचा सिद्धांत  
[४] या लेखाचे मूळ लेखक आणि ’पेंटॅगॉन’मधील माजी अधिकारी व सध्या अमेरिकन एन्टरप्राईज ईन्स्टिट्यूट मध्ये विश्लेषक म्हणून काम करणार्या मायकेल रुबिन यांच्यावर राष्ट्राध्यक्ष एरेडोआनयांच्याबद्दल अपमानास्पद लिखाण केल्याबद्दल, फेतुल्लासमर्थित आतंकवादी संघटना FETÖ ला समर्थन दिल्याबद्दल खटला घालण्यात आला होता. मूळ इंग्रजी लेख या दुव्यावर वाचता येईल.
[५] सायप्रस हे पूर्वी एक स्वतंत्र राष्ट्र होते पण, त्या बेटावरील तुर्की वंशाच्या नागरिकांनी त्या बेटावर अचानकपणे आक्रमण करून त्याचा कांही भाग काबीज केला होता. 
[६]  एक अब्ज म्हणजे एक बिलियन म्हणजेच १०० कोटी!