सळसळत्या उत्साहात गणेश आगमनाला प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 August 2017

कोल्हापूर - आबालवृद्धांचा लाडका विघ्नहर्ता गणपती बाप्पा शुक्रवारी (ता. 25) आनंदाचे भरते घेऊनच घराघरांत विराजमान होणार आहे. गणेश चतुर्थीदिवशी होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आता सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमन सोहळ्याला प्रारंभ झाला असून, आज पूलगल्ली तालीम मंडळाच्या भव्य दशभुजा गणपतीचे आगमन झाले. 

दरम्यान, गणेश चतुर्थीदिवशी मूर्तींची विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल. मंडप आता सजले असून, रोषणाईने गल्लीबोळा झळकू लागल्या आहेत. 

घरगुती बाप्पांचा यंदा सात दिवसांचा; तर सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचा अकरा दिवसांचा मुक्काम असेल. साहजिकच, आता सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थी असून, त्यानंतर मंगळवारी (ता. 29) गौराई आगमन अर्थात गौराई माहेरी येईल. या निमित्ताने आता सर्वत्र गौराई गीते आणि खेळांना प्रारंभ होणार आहे. भाजी-भाकरीचा नैवेद्य घेऊन गौराई विसावतील. बुधवारी (ता. 30) शंकरोबाचे आगमन होणार आहे. सायंकाळी दोघांचीही यथासांग पूजा होईल. गुरुवारी (ता. 31) गौरी-गणपती विसर्जन होणार आहे. 

पर्यावरणपूरक सजावटीचे  फोटो शेअर करा "सकाळ'कडे 
चैतन्यदायी गणेशोत्सवात आबालवृद्ध सहभागी होतात. घरगुती बाप्पांची आरास आणि सजावटही आता अतिशय कल्पकपणे केली जाऊ लागली आहे. या सजावटीला विविध सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आवश्‍यक संदेशांची झालरही आता लाभते आहे. तुमच्या पर्यावरणपूरक, कल्पक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या आरास-सजावटीचे फोटो जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी "सकाळ'ने यंदा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यातील निवड फोटोंना "सकाळ'मधून प्रसिद्धी दिली जाईल. त्याशिवाय, उमेदीच्या काळातील तुमच्या गणेशोत्सवातील आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोंसाठीही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार आहे. त्यातील काही निवडक छायाचित्रांना "सकाळ'मधून प्रसिद्धी दिली जाईल. तुमची सजावट आणि जुने फोटो व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून शेअर करा या क्रमांकावर ः 9146190191. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 kolhapur ganesh ustav