दोनशे वर्षांच्या ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 August 2017

संस्थान गणेशोत्सव सुरू - कागदी लगद्याची मूर्ती

सांगली - सांगली संस्थानचे श्री गणेश मंदिर आणि दरबार हॉलमधील गणेशोत्सवाची परंपरा २०० वर्षांची आहे. दररोजची पूजा-अर्चा आणि सेवा परंपरेने सुरू आहे. घोडे, उंटासह निघणारा छबिना, दररोजची गायनसेवा आणि रात्रीची गस्त अशी वैशिष्ट्ये आहेत. ‘चोर’ गणपतीची प्रथा पूर्वांपार आहे. आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना भक्तिभावाने झाली. पाच दिवस उत्सव आहे. 

गणेशनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव, मात्र प्रतिपदेलाच (चतुर्थीच्या तीन दिवस आधी) सुरू होतो. त्यामुळे गणपती केव्हा आले अन्‌ गेले त्याचा सांगलीकरांना पत्ताच लागत नाही. म्हणूनच चोर पावलांनी येणाऱ्या विघ्नहर्त्याला ‘चोर गणपती’ म्हणण्याची प्रथा  रूढ झाली असावी, अशी माहिती मुख्य पुजारी अशोक 
पाटणकर आणि रमेश पाटणकर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली. 

श्री. पाटणकर म्हणाले, ‘‘२५ ऑगस्टला श्री गणेश चतुर्थी आहे. पण पंचायतनचा गणपती उत्सव भाद्रपद  शुद्ध प्रतिपदा (२२ ते २७ ऑगस्ट) दरम्यान आहे. आज प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना झाली. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. विशेष बाब म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून (इको फ्रेंडली) मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून आहे तशी आहे. 
रंगरगोटीशिवाय अन्य कोणतेही काम केले जात नाही. मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. गणेशभक्तांना हात लावून दर्शन घेता येते. गणेशोत्सवानंतर मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्यात येतात.’’ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news chor ganpati