मराठा आरक्षणासाठी कऱ्हाडमध्ये मुंडण; गाजराचे वाटप

हेमंत पवार 
Tuesday, 7 August 2018

दरम्यान सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत काहीच कार्यवाही होत नाही असा आरोप करत मराठा समाजातील तरुणांनी आज येथील दत्त चौकात मुंडण आंदोलन करुन लक्ष वेधले.
 

कऱ्हाड - एक मराठा... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय रहात नाय... या ना अशा अनेक घोषणा देत शहरातुन आज मसुर-कोपर्डे हवेली, उंब्रज व परिसरातील आबालवृध्दांनी आज शहरातुन रॅली काढुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

दरम्यान सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत काहीच कार्यवाही होत नाही असा आरोप करत मराठा समाजातील तरुणांनी आज येथील दत्त चौकात मुंडण आंदोलन करुन लक्ष वेधले.

मराठा आरक्षणासाठी सरकारने आजपर्यंत समाजाला गाजरचं दाखवले आहे असा आरोप करत येथील दत्त चौकातील महिलांच्या ठिय्या आंदोलनस्थळी मराठा समाजाच्यावतीने रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनधारकांना गाजराचे वाटप करण्यात आले. सरकारने आतातरी गाजर दाखवुन फसवणुक करु नये असे म्हणत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी अचानक आंदोलनाचा पावित्रा घेतल्याने काहीकाळ धावपळ उडाली. घटनास्थळी प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, पोलिस उपाधिक्षक नवनाथ यांनी भेट दिली.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha in Karhad