#MarathaKrantiMorcha नेवाशात बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ

WhatsApp-Image-2018-08-05-a.jpg
WhatsApp-Image-2018-08-05-a.jpg

नेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत असल्याने पोलिस प्रशासनाने दक्षता म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 

 'एक मराठा... लाख मराठा..' 'यळकोट.. यळकोट.. जय मल्हार' व 'आरक्षण दो.. आरक्षण दो..' 'हम सबको आरक्षण दो..' या घोषणा देत सकल मराठा समाजाचे अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, मेजर संभाजी माळवदे, दीपक धनगे, धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर व मुस्लीम नेते युसुफ बागवान यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज नेवासे शहरातील खोलेश्वर चौकात मंडप देवून बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना या बाबत आंदोलकांच्या वतीने शनिवारी निवेदन देण्यात आले होते.

आंदोलकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत देऊन या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी देऊन त्वरित काम सुरू करावे, छत्रपतींची जयंती 19 फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी करावी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्या मांडणात आल्या आहे.

दरम्यान सकाळ पासून आंदोलकांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. नेवाशाचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक नगरसेवक . काकासाहेब गायके, लक्ष्मण जगताप, फारूक आतार, जितेंद्र कुर्हे, आंबादास इरले, संजीव शिंदे, बाळासाहेब मारकळी,  बाळासाहेब कोकणे, सादिक शिलेदार,  राजेंद्र उंदरे, पोपट जिरे, जाकीर शेख, अभिजीत मापारी, जितेंद्र महाले, कल्पेश बोरकर, असिफ पठाण, माऊली तोडमल,  विशाल सुरडे, महेश कोकणे, यांनी आंदोलकांची भेट घेवून जाहीर पाठिंबा दिला.

पोलिसांची सावध भूमिका
शनिवारी सायंकाळी नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे वाहन अडवून त्यांना सकल मराठा समाजाच्या कार्येकर्त्यांनी मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावर राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी आमदार मुरकुटे यांनी मैन पाळत कोणतीच प्रतिक्रिया देत नसल्याने कार्येकर्ते आणखीच भडकले होते. दरम्यान पोलिसांनी वेळीच दाखल घेतल्याने वातावरण शांत झाले. त्याच पार्श्वभूमीवर आज सहाय्यक पोलिसनिरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी आंदोलन स्थळी भेट घेवून आंदोलकांशी चर्चा केली. सावध भूमिका म्हणून पोलिस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.  

लढा आणखी तीव्र करणार : अनिल ताके
मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावर नेवासे शहरात चालू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार असून शासनाने आंदोलकांची दाखल न घेतल्यास आंदोलनाचा हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते अनिल ताके यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com