Maratha Kranti Morcha; पंढरपुरात बंदला प्रतिसाद; काही ठिकाणी टायर जाळले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

पंढरपूर - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या पंढरपूरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. शाळा व महाविद्यालयेदेखील बंद होती. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन, तीन ठिकाणी टायर पेटविण्याच्या घटना घडल्या. आज सकाळपासून शहरातील सर्वच भागांतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहर कडेकोट बंद होते. एसटी आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दर महिन्याच्या एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्याप्रमाणे दोन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. आज द्वादशी दिवशी बंदमुळे एसटी वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना पंढरपुरातून परत गावी जाण्यात अडचण निर्माण झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh