कोल्हापूरच्या अंबाबाईची अष्टभुजा महासरस्वती रुपात पुजा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

कोल्हापूर ः येथील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या चाैथ्या दिवशी (रविवारी) अष्टभुजा महासरस्वती रुपात श्री अंबाबाईची पुजा बांधण्यात आली. ही पुजा श्री पुजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

कोल्हापूर ः येथील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या चाैथ्या दिवशी (रविवारी) अष्टभुजा महासरस्वती रुपात श्री अंबाबाईची पुजा बांधण्यात आली. ही पुजा श्री पुजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

अष्टभुजा महासरस्वती रूपात श्री अंबाबाईची पूजा
दुर्गासप्तशतीमधील उत्तम चरित्राची नायिका म्हणजे महासरस्वती. हिचे नाव महासरस्वती असले तरी ही दुर्गेचेच एक स्वरूप असल्याचे दिसून येते. पार्वतीच्या शरीरकोशापासून निर्माण झाली अशी कथा असल्याने कौशिकी हे या देवतेचे दुसरे नाव. या देवतेचा युद्धप्रसंग अधिक भीषण पद्धतीने मांडल्याचे आढळते. शुंभ-निशुंभ या असुरांच्या नाशासाठी महासरस्वती या स्वरूपाचा आविर्भाव झाल्याची कथा आहे. तिने शुंभ-निशुंभांच्या धूम्रलोचन नामक दूताला नुसत्या हुंकाराने भस्मसात केले, तर आपल्या भ्रुकुटीपासून काली निर्माण करून चंड-मुंड या राक्षसांचा नि:पात घडवला. त्यामुळे तिला चामुंडाही नाव प्राप्त झाले. कौशिकीची कथा अधिक विस्तृत स्वरूपात देवीभागवत ग्रंथामध्ये येते. उत्तम चरित्रानुसार या देवतेच्या पराक्रमामध्ये विविध देवांची स्त्रीरूपेही सहाय्यकर्ती झाली, जसे ब्रह्माणी, कौमारी, वैष्णवी, माहेश्‍वरी आदी ज्यांना मातृका असे म्हटले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news ambabai puja

टॅग्स