जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जोतिबा डोंगर -  जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात रविवारी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर गर्दीने फुलून गेला. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पोलिस यंत्रणेस गर्दी नियंत्रित करताना दमछाक झाली.  नवरात्रोत्सवातील चौथा दिवस व रविवार असल्याने राज्यभरातील भाविक पहाटेपासून डोंगरावर आले. सकाळी तर ठाकरे-मिटके गल्लीपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या. भर उन्हात चार पदरी रांगेतून भाविकांनी दर्शन घेतले.

रविवारी श्रींची पाच पाकळी सोहन कमळपुष्पातील सालंकृत महापूजा बांधली.  महापूजा दगडू भंडारी, उदय शिंगे, गजानन लादे, अंकुश दादर्णे, बाबासाहेब लादे, प्रवीण कापरे, तसेच दहा गावकर यांनी बांधली.

पहाटे घंटानाद होऊन श्रींची पाद्यपूजा व काकडआरती झाली. हे पठण केदारी उपाध्ये, सूरज उपाध्ये, शरद बुरांडे, प्रकाश उपाध्ये, बंडा उमराणी यांनी केले. त्यानंतर श्रींची महापूजा बांधली. सकाळी मंदिरात धुवापरती सोहळा झाला. सर्व देवसेवक उंट, घोडा देवस्थान समितीचे अध्यक्ष लक्ष्मण डबाणे, महादेव दिंडे, सिंधीचा देवस्थान ट्रस्टचे अधीक्षक आर. टी. कदम आदी उपस्थित होते. 
 
शुक्रवारी दिवे ओवाळणी
जोतिबा डोंगरावर शुक्रवारी (ता. २९) रोजी दिवे ओवाळणी सोहळा महिला साजरा करतील. पहाटे चार ते सकाळी सहापर्यंत हा सोहळा चालेल. तांदळाच्या पिठाचे दिवे तयार करून त्या दिव्यात तूप घालून ते दिवे प्रज्वलित करून सर्व मंदिरात दिवे ओवाळले जातील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Crowd of devotees on Jotiba dongar