टेंबलाई टेकडीवर उद्या ललिता पंचमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - देवीचे दर्शन आणि तेल वाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी टेंबलाई टेकडी परिसर गर्दीने फुलून गेला. सोमवारी (ता. २५) ललिता पंचमीनिमित्त होणाऱ्या यात्रेसाठी परिसर सज्ज झाला आहे. विविध खेळणी-खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी गजबजून गेला आहे.

दरम्यान, यात्रेसाठी ‘केएमटी’सह विविध संस्थांतर्फे विशेष बस सेवा दिली जाणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रात्री रास-दांडियाच्या जल्लोषाला प्रारंभ झाला.

ललिता पंचमी म्हणजे कोहळा पंचमी. ललिता पंचमीच्याच दिवशी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे टेंबलाई देवीचे प्रतीक रूपकुमारीच्या पूजनानंतर तिच्या साक्षीने कोहळा फोडला (कुष्मांड बळी) जातो. रविवारी (ता. २४) रात्री बारा वाजता देवीस महाअभिषेक करून नंतर सालंकृत पूजा बांधली जाईल. सोमवारी (ता. २५) सकाळी साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर अंबाबाईची मुख्य पालखी पारंपरिक मार्गाने टेंबलाई टेकडीकडे देवीच्या भेटीस येईल. लवाजम्यासह पारंपरिक पद्धतीने फुलांनी सजविलेली तुळजाभवानीची पालखी भवानी मंडपातून यात्रेसाठी बाहेर पडेल. गुरुमहाराजवाडा येथील गुरुमहाराजांची पालखीही याच वेळी टेंबलाई टेकडीकडे रवाना होईल. टेंबलाई टेकडी येथे दुपारी बाराच्या सुमारास कोहळापूजन होईल.

मृदूलाला मान
सूर्योदयाची पंचमी सोमवारी आहे, या दिवशी ललिता पंचमीचा सोहळा व यात्रा होईल. कुमारी पूजनाचा मान यंदा मृदूला गुरव हिच्याकडे असल्याचे संतोष गुरव यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news lalita panchami in temblabai temple