श्री अंबाबाईची अष्टमीनिमित्त महिषासूरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज अष्टमीनिमित्त महिषासूरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री पुजक माधव व मकरंद मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली. त्यांना रवी माईनकर यांनी सहाय्य केले.

महिषासुरमर्दिनी पुजा... 
समस्त त्रैलोकास महिषासुराने त्रस्त करून सोडले होते. असा हा महिषासुर अष्टमीच्या दिवशी संपला. श्री अंबाबाईने आदिशक्ती विराटरुप धारण करून महिषासुराचा वध केला. यासाठी नवरात्रामध्ये अष्टमीच्यादिवशी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पुजा बांधण्यात येते. असे या पुजेचे महात्म्य आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news shri ambabai puja

टॅग्स