सांगलीत टिपऱ्यांचा आवाज लागला घुमू...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सांगली - नवरात्रोत्सवात गुरुवारी घटस्थापना झाली आणि शनिवारी टिपऱ्यांचा आवाज घुमू लागला. येथील विविध मंडळांनी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले असून त्यात फनी गेम्स, विविध स्पर्धांना जल्लोषात सुरवात झाली आहे. 

सांगली - नवरात्रोत्सवात गुरुवारी घटस्थापना झाली आणि शनिवारी टिपऱ्यांचा आवाज घुमू लागला. येथील विविध मंडळांनी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले असून त्यात फनी गेम्स, विविध स्पर्धांना जल्लोषात सुरवात झाली आहे. 

गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे. शहरातील हा उत्सव आता ग्रामीण भागातही पोचला आहे. पहिल्या दिवशी पारंपरिक दुर्गामाता दौडीने नवरात्रोत्सव सुरू झाला. 

यावर्षी शहरात धामधूम अधिक आहे. विश्रामबागमध्ये स्फूर्ती चौकात नगरसेवक युवराज गायकवाड यांनी नवरात्रोत्सव घेतला आहे. त्यात दांडिया, फनी गेम्स, रेकॉर्ड डान्स, व्याख्यान, हळदी-कुंक, भजन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. रतशीनगर नवरात्रोत्सव मंडळामध्ये जल्लोषात कार्यक्रम सुरू आहेत. येथील पंचमुखी मारुती रस्त्यावरील सांगली महिला परिषदेतर्फे शारदोत्सव सुरू आहे. 

एरंडोलीत महाआरती
एरंडोली (ता. मिरज) येथे  श्री जान्हवी देवीची महाआरती झाली. त्याला मिरज पूर्व भागासह सीमा भागातून भक्तांनी गर्दी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांची दौड
जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी शुक्रवारी दुर्गामाता दौडीत सहभाग घेत सगळी दौड पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिरापर्यंत त्यांनी झेंडा घेऊन दौडीत सहभाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news navratri festival