esakal | ऑलिम्पिक विजेता जपानचा 'हा' खेळाडू बनला फूड डिलिव्हरी बॉय...

बोलून बातमी शोधा

Reo Miyaki Japanese swordsman has become a food delivery boy

जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान मानले. सर्वच घटकांना याचा फटका बसला आहे.जगातील एक तृतीयांश लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये आहे.
आर्थिक चणचणी बरोबर अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहेत. कोरोनाचा फटका क्रिडा विश्‍वालाही बसला आहे. त्यामुळे सर्वच स्पर्धा एक तर रद्द झाल्या तर काही लांबणीवर टाकल्या आहे. त्याला ऑलिम्पिक स्पर्धाही अपवाद ठरलेली नाही. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाने टोकिओ ऑलिम्पिक एक वर्षासाठी लांबणीवर टाकले आहे.

ऑलिम्पिक विजेता जपानचा 'हा' खेळाडू बनला फूड डिलिव्हरी बॉय...
sakal_logo
By
युवराज इंगवले

कोरोनाच्या धास्तीने क्रिडा केंद्र बंदच आहेत, त्याचबरोबर बहुतांश देशातील सराव बंद आहेत. अशातच पैशाची चणचण भासत असल्याने जपानचा तलवारपट्टू रेओ मियाकी हा फुड डिलिव्हिरी बॉय बनला आहे. या कामात तो आनंद मानत असून यामुळे पैशांची गरज तर पूर्ण होत आहे त्याचबरोबर सायकलीवरून फूड डिलिव्हिरी करत असल्याने शारिरिक तंदुरूस्ती चांगली राहण्यास मदत होत असल्याचे मियाकी याने म्हटले आहे. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने तलवारबाजीत रौप्य पदक पटकाविले आहे.याबाबत मियाकी सांगतो, लॉकडाऊनमुळे जीम बंद आहेत.त्यामुळे फिटनेस राखण्यासाठी मला फूड डिलिव्हिरी बॉयची नोकरी करावी लागत आहे. रेस्टारंटमधून सायकलीवरून ऑडर्रप्रमाणे प्रत्येकाच्या घरी फूड पॅकेट घेऊन जात असल्याने व्यायामाची कसर भरून निघत आहे. त्यामुळे आपोआपच तंदुरूस्त राखण्यास मदत होत आहे.

आरामात नोकरी मिळाली

सायकलीमुळे शरीराची हालचाल होत असल्याने चपळपणा राखला जात आहे. तसेच चांगली आर्थिक कमाईही होत आहे. लॉकडाऊननंतर टोकिओ ऑलिम्पिक होणार असल्यास त्याच्या तयारीसाठी पैशांची गरज भासणार आहे. त्यासाठी आतापासून पैशांची तडजोड करत आहे. सध्या फूड डिलिव्हिरी बॉय म्हणून खूप मागणी आहे, त्यामुळे मला आरामात ही नौकरी मिळाली आहे. मी त्याचा पूरेपूर आनंद लूटत असल्याचे मियाकी यांने सांगितले.

पाहा - PHOTO : लॉकडाऊनचा प्रतिभाशाली आविष्कार : चित्रकार अन्वर हुसेन यांच्या चित्रांचे गारूड !
 

कोरोनाचा धोका नाही

मियाकी म्हणतो, कंपनीच्या नियमानुसार फुड पॅकेट घरचा दरवाजाजवळ ठेवावे लागते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी राहतो.मात्र फूड पॅकेट आणण्यासाठी रेस्टारंटमध्ये जावे लागते. लॉकडाऊनच्या काळातही मी स्वतःच्या हिंमतीच्या जोरावर आर्थिक चणचण भरून काढू शकतो याचा मला अभिमान वाटतो.

ऑलिम्पिकबाबत अजूनही संभ्रम

कोरोनामुळे तलवारबाजीच्या अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्या होतील की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचा सराव करण्यासाठी संधीच मिळत नाही आहे. तलवारबाजीचा सराव पार्टनरशिवाय केला जाऊ शकत नाही. ही एक मोठी समस्या आहे. टोकिओ ऑलिम्पिक एक वर्षासाठी लांबणीवर टाकले आहे. त्याबाबत अजूनही निश्‍चित असे काही सांगितले जाऊ शकत नाही. त्यामुळे तंदुरूस्तीवरच मी लक्ष्य केंद्रीत करत असल्याचे मियाकी याने नमदू केले आहे.