महत्वाच्या समितीतून विरोधक 'आउट' 

Opposition out from important committee
Opposition out from important committee

कोल्हापूर : जिल्हा परिषद सत्ता बदलानंतर आता विषय समितीत फेरबदल करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, माजी समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे व माजी बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील -पेरिडकर या मावळत्या पदाधिकाऱ्यांना पशुसंवर्धन समितीत घालण्याच्या निर्णय सत्ताधारी गटाने घेतला आहे. तर माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व माजी महिला बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांना मात्र अर्थ समिती दिली आहे. जर विरोधकांना या समित्या मान्य झाल्या नाहीतर निवडणूक होण्याची शक्‍यता असल्याने सत्ताधाऱ्यांचा यात कस लागणार आहे. 

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने भाजपची सत्ता घालवली. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 2 रोजी अध्यक्षपदी बजरंग पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड झाली. तर 16 रोजी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. ही निवडणूक बिनविरोध झाली. यात हंबीरराव पाटील यांची बांधकाम, प्रवीण यादव यांची शिक्षण, डॉ.पदमाराणी पाटील यांची महिला बालकल्याण तर स्वाती सासणे यांची समाजकल्याण समिती सभापती म्हणून निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती झाल्याने त्यांच्या विषय समितीतील रिक्‍त जागेवर सदस्यांची नेमणूक करण्यासाठी आज बैठक झाली. 

अध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस सर्व पदाधिकारी तसेच पक्षप्रतोद उमेश आपटे, शशिकांत खोत आदी मोजके सदस्य उपस्थित होते. यावेळी माजी पदाधिकाऱ्यांनी तीन वर्षात विरोधकांना चांगली वागणूक दिली नसल्याची तक्रार केली. निधी देताना तोंड पाहून निधीचे वाटप झाले. दिलेल्या पत्रांचाही विचार झाला नाही. त्यामुळे समिती देतानाही काही सहानुभूती ठेवण्याची गरज नाही, अशी चर्चा झाली. त्यामुळे सर्व संमतीनेच महाडिक, घाटगे, महापुरे व पेरीडकर यांना पशुसंवर्धन समिती दिली आहे. 

पंचायत समिती सभापतींना प्रमोशन 
सर्वसाधारणपणे पंचायत समिती सभापतींना तुलनेने कमी महत्वाच्या समितीवर सदस्य करण्यात येते. मात्र सत्ताबदलानंतर याचे पडसाद आता पंचायत समितीस्तरापर्यंत उमटत आहेत. माजी पदाधिकाऱ्यांना कमी महत्वाच्या समित्यांवर सदस्य करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतल्याने पंचायत समितीच्या सभापतींचे आपोआपच 'प्रमोशन' झाले आहे. हे करत असतानाही कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सभापतींना झुकते माप दिले आहे. 

आपटे जलव्यवस्थापन, बोरगेंना बांधकाम 
माजी अध्यक्ष उमेश आपटे कृषी समितीत होते. ते आता प्रवीण माने यांच्या जलव्यवस्थापन समितीतील जागेवर गेले आहेत. तर माने यांना समाजकल्याण समिती दिली आहे. राष्ट्रवादीचे विजय बोरगे यांना उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या बांधकाम समितीच्या जागेवर पाठवले आहे. तसेच नूतन बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांच्या बांधकाम समिती सदस्य पदाच्या जागेवर शिल्पा शशिकांत खोत (सेनापती कापशी) यांची नियुक्‍ती केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com