आजरा तालुक्यातील 'या' गावात 108 पैकी 104 अहवाल निगेटिव्ह

104 Out Of 108 Reports In Bhadwan Are Negative Kolhapur Marathi News
104 Out Of 108 Reports In Bhadwan Are Negative Kolhapur Marathi News
Updated on

आजरा : भादवण परिसरातील पाच सहा गावातील 108 जण एका खासगी डॉक्‍टरांच्या संपर्कात आले होते. त्यांना क्वारंटाईने केले होते. त्यांपैकी चार जण वगळता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे समूह संसर्गाची व्यक्त होणारी भिती तुर्त तरी टळली असून आरोग्य विभागाने सुटकेचा निश्‍वास घेतला आहे. या परिसरातील सहा सात गावात "कडक लॉकडाऊन' पाळले जात आहे. 

भादवणमधील एका डॉक्‍टर पत्नीचा अहवाल 30 जूनला पॉझिटिव्ह आला होता. हा तालुक्‍यातील कोरोनाचा पहिला स्थानिक संसर्गाचा रुग्ण होता. त्या डॉक्‍टरांचा गावात दवाखाना आहे. तेथे तपासणी व उपचारासाठी आलेल्या भादवणसह खोराटवाडी, जाधेवाडी, मासेवाडी, हाजगोळी, पेद्रेवाडी, भादवणवाडी रुग्णांची यादी आरोग्य यंत्रणेने तयार केली. या यादीमध्ये 11 जूनपासून संपर्कातील 108 जणांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. संबंधीत चारही जण स्थानिक असल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली होती.

प्रशासनाकडून याचीही गंभीर दखल घेतली. संबंधीताचे नातेवाईक व संपर्कात आलेल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळवण्याचे काम युध्द पातळीवर सुरू होते. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. त्याचबरोबर ताप, सर्दी खोखला असलेल्यांनाही उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांनाही आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणाखाली ठेवले होते. अतिशय शिस्तबध्द व काटेकोर उपाय योजना राबविल्याने भादवणमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणा, प्रशासन, ग्रामपंचायतीला यश आले आहे. 

भादवणमध्ये गेले बारा दिवस कडक लॉकडाऊन आहे. ग्रामस्थांना घरांच्या बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. दुकाने, दुधसंकलन, बॅंकींग व्यवहार, शेती उपयोगी दुकाने बंद ठेवली आहेत. विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या गावातील धोका टळला असून ग्रामपंचायत, दक्षता समिती, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्य खात्याची उपकेंद्रीची यंत्रणा, पोलिस पाटील, स्वयंसेवक यांनी सांघिक कामगीरीने प्रयत्न सुरू आहेत. तालुक्‍याच्या प्रशासनाकडून सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. 

संसर्गाचा धोका टळला
भादवणमध्ये कडक लॉकडाऊन केले. लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. मास्क सक्तीचे केले आहे. गावात औषध फवारणी करण्यात येत असून बाधीतांच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केले असल्याने समूह संसर्गाचा धोका टळला आहे. 
- संजय पाटील सरपंच, भादवण 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com