108 रुग्णवाहिका की शववाहिका?, आजरा पंचायत समिती सभेत सवाल

108 Ambulances Or The corpse vessel?, Question In The Azra Panchayat Committee Meeting Kolhapur Marathi News
108 Ambulances Or The corpse vessel?, Question In The Azra Panchayat Committee Meeting Kolhapur Marathi News
Updated on

आजरा : आजऱ्यातील 108 या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्‍सिजनची सुविधा नाही. डॉक्‍टरांना मदतनीस नाही. पाण्याचीही सोयही उपलब्ध नाही. यामुळे एक रुग्ण दगावला आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका आहे की, शववाहिका आहे? असा सवाल पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई यांनी उपस्थित केला. कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. या उद्योगाला सवलती द्याव्यात, अशी मागणीही आज झालेल्या पंचायत समितीच्या सभेत करण्यात आली. याबाबतचा ठराव झाला. सभापती उदयराज पवार अध्यक्षस्थानी होते. 

"सकाळ'चे माजी संपादक अनंत दिक्षीत यांना आदरांजली वाहण्याचा ठराव देसाई यांनी मांडला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे यांनी आरोग्य विभागाचा अहवाल मांडला. या वेळी देसाई म्हणाले, ""तालुक्‍यातील 108 या रुग्णवाहिकेमध्ये सेवांचा कमतरता आहे. ऑक्‍सिजनची व्यवस्था नाही. डॉक्‍टरांना मदतनीस नाही. पाण्याचीही सुविधा नाही. एकादा रुग्ण गंभीर असल्यास त्यावेळी काय करावे. ताबडतोब संबंधीत कंपनीला कळवून सुविधा पुरवण्याची मागणी करावी.''

याबाबतचा ठराव झाला. रचना होलम म्हणाल्या, ""कोरोनाच्या अफवामुळे पोल्ट्री उद्योग पुर्णतः कोलमडला आहे. उद्योजक बेरोजगार झाले आहेत. गैरसमजुतीमुळे कोणी चिकन खाईना झाल्याने पक्ष्यांची उचल थांबली आहे. त्यामुळे या उद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी पोल्ट्री धारकांना नुकसान भरपाई मिळावी. त्यांचे वीजबिल माफ करावे. कर्जामध्ये व्याजाला सवलत मिळावी.

कोंबड्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे.'' सदस्य शिरीष देसाई यांनी हा विषय उचलून धरला. याचा ठराव घेण्यात आला. महावितरणकडील लहान ठेकेदारांना काम मिळत नाही. त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे महावितरणेने लहान ठेकेदारांचा विचार करावा, अशी मागणी सभेत करण्यात आली. वर्षा बागडी म्हणाल्या, ""कोवाडेमधील वायरमन यांची ग्राहकांशी वागणुक ठिक दिसत नाही. त्यांची एप्रिलपर्यंत बदली करावी.''

वनविभागातील वनखुदाईचे काम पुर्णत्वाकडे असून वनगाई व गव्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने दिली असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. सभापती पवार यांनी वनतळ्याची जागा निश्‍चित करून त्यांची लेखी माहिती द्या, अशी मागणी केली. आगीपासून जंगलाचे संरक्षण होण्यासाठी उपाय योजना करा. माहिती फलक, ग्रामपंचायत व गावागावात सभा प्रबोधन करावे, अशी सुचना रचना होलम यांनी केली. वर्षा कांबळे यांनीही चर्चेत भाग घेतला. वर्षा बागडी यांनी आभार मानले. कोरोना बाबत गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी माहिती दिली. अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले. कृषी, रस्ते, बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विषयांवर चर्चा झाली. 

...तर त्यांचे बिल देवू नका ! 
मसोली शाळेचे काम व्यवस्थित झालेले नाही. ग्रामस्थांनी हे निदर्शनास आणताच अधिकारी नीट उत्तरे देत नाहीत. शाळेचे काम व्यवस्थित झाले नसेल, तर बिल देवू नका. ठेकेदारांचे नाव ब्लॅकलिस्टला टाका, असे सभापती पवार यांनी सभेत सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com