हेऱ्यामध्ये दोन दिवसांत 127 मिलिमीटर पाऊस

127 MM Of Rain In Two Days In Here Village Kolhapur Marathi News
127 MM Of Rain In Two Days In Here Village Kolhapur Marathi News

चंदगड : तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. आज पहाटे 8 वाजेपर्यंत चोवीस तासांत सरासरी 58 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस हेरे मंडलमध्ये 127 मिलिमीटर, तर त्यापाठोपाठ चंदगड 72, माणगाव 66, तुर्केवाडी 42, नागनवाडी 36 व कोवाड मंडलमध्ये सर्वात कमी 8 मिलिमीटर पाऊस झाला. 

गेले सुमारे दहा दिवस पावसाने उघडीप दिली होती. प्रत्येक मंडलमध्ये 5 ते 10 मिलिमीटर पावसाची नोंद होत होती, परंतु सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सर्वाधिक पाऊस झाला. बदलणारे वातावरण सर्दी, पडसे यासारख्या आजारांना निमंत्रण ठरत आहे. कोरोनासारख्या रोगाशी सामना करताना अशाप्रकारच्या वातावरणामुळे नागरिकांतून भीती आहे. पावसाने ताम्रपर्णी व घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शेता-शिवारातही पाणी साचले आहे.

हेरे मंडलमध्ये गेल्या दोन वर्षापासून अतिरिक्त पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. विशेषतः उसात पाणी साचूनमुळे कुजल्यामुळे वाढीवर परिणाम झाला होतो. काही ठिकाणी पिके कुजली होती, तर बहुतांश ठिकाणी वाढ न झाल्यामुळे उत्पन्नात घट आली होती. तिच स्थिती या वर्षीही उद्भवू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या भात पीक पोटरीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पुढच्या दोन आठवड्यात पीक कापणीसाठी आले आहे.

कापणी, मळणीच्या कामात व्यत्यय
पावसाळी वातावरण राहिल्यास कापणी व मळणीच्या कामात व्यत्यय येतो. नुकसानही होते. शिवाय भात कापणीपूर्वी वाफ्यातील पाणी आटून वाफे सुके होणे गरजेचे असते. त्यामुळे आता पावसाची गरज नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com