निपाणी दर्ग्यात आहे ३५२ वर्षांची परंपरा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

देसाई सरकार घराण्यातर्फे आयोजन; मानकऱ्यांसह सवाद्य मिरवणूक

निपाणी : दिवाळीनिमित्त बाळासाहेब देसाई-सरकार घराण्यातर्फे येथील हजरत पिरानेपीर साहेब दर्ग्यासह संत बाबामहाराज चव्हाण यांच्या समाधीस शनिवारी (ता. १४) अभिषेक झाला. ३५२ वर्षांपासून अभिषेकाची परंपरा आहे.

चव्हाण वाड्यातील संत बाबामहाराज चव्हाण यांच्या समाधीस नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार यांच्या हस्ते अभिषेक झाला. त्यानंतर मानकरी, लवाजम्यासह सवाद्य मिरवणुकीने दर्ग्यास गलेफ नेला. मानकरी व फकिरांच्या उपस्थितीत वर्षातील पहिला अभिषेक घालून पूजा होऊन प्रसादाचे वाटप झाले. विद्यामंदिर शाळेच्या मागील बाजूस असलेल्या संत बाबामहाराज चव्हाण यांच्या समाधीस पृथ्वीराज चव्हाण, रणजित देसाई, संग्राम देसाई यांच्या हस्ते अभिषेक घातला. संत बाबामहाराज चव्हाण भजनी मंडळाच्या कार्यक्रमासह आरती झाली.

कार्यक्रमास विवेक मोकाशी, राजूबाबा निपाणकर, धोंडीराम खोत, संजय माने, गौरंग तिळवे, राजू रांगोळे, संभाजी मुगळे, शामराव कांबळे, वसंत रावळ,सदाशिव डवरी, अनिल सांगावकर, बाळासाहेब गुणके, अजित कांबळे, मोहन कांबळे, सुजित गायकवाड, हदाले पैलवान, राजू रेडेकर, पिंटू कमते, दिलावर गडकरी, बाळासाहेब पोतदार, निनाद पोवार, राजू शेटके, खाजू मुजावर, इरफान मुजावर, अजित भोकरे, बाळासो सुतार, प्रकाश पोटजाळे, शरद माळगे, शौकत मुल्ला, किरण सुतार, कृष्णा डवरी, मच्छींद्र डवरी, प्रदीप रावळ, पितांबर कांबळे, बंडोपंत गंथडे, वसंत रावळ  यांच्यासह मान्यवर उपस्थित ंहोते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 352 years tradition of Nipani Dargah