आजरा क्रीडा संकुलसाठी 5 कोटींचा नवीन प्रस्ताव

रणजित कालेकर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आजरा शहरात उभारण्यात येत असलेले क्रीडा संकुलात विविध सेवा सुविधा पुरवण्यात येतील. हे क्रीडा संकुल सुसज्ज करण्यात येईल. त्याचबरोबर आजऱ्याच्या वैभवात भर घालणारे असले. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा पटू तयार होण्यासाठी प्रयत्न राहील, अशी ग्वाही राधानगरी मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. क्रीडा संकुलाचा नवीन 5 कोटींचा प्रस्ताव पाठवून राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

आजरा :आजरा शहरात उभारण्यात येत असलेले क्रीडा संकुलात विविध सेवा सुविधा पुरवण्यात येतील. हे क्रीडा संकुल सुसज्ज करण्यात येईल. त्याचबरोबर आजऱ्याच्या वैभवात भर घालणारे असले. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा पटू तयार होण्यासाठी प्रयत्न राहील, अशी ग्वाही राधानगरी मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. क्रीडा संकुलाचा नवीन 5 कोटींचा प्रस्ताव पाठवून राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

येथील क्रीडा संकुलच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार आबिटकर आले होते. क्रीडा संकुलच्या कामाची पाहणी करून त्यांनी क्रीडा अधिकारी, बांधकामचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. या वेळी आजऱ्याचे तहसीलदार व क्रीडा समितीचे कार्याध्यक्ष विकास अहिर, जिल्हा क्रीडाधिकारी साखरे, गटविकास अधिकारी व समिती सदस्य बी. डी. वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. 

आमदार आबिटकर म्हणाले, ""आजरा तालुक्‍याच्या क्रीडा संकुलासाठी नऊ एकर जमीन मिळाली आहे. यात विविध क्रीडा प्रकारासाठी सोयी सुविधा उपलब्ध करता येणे शक्‍य आहे. क्रीडा संकुलचा मुळ आराखडाच्या खर्च एक कोटी इतका आहे. नवीन पाच कोटींचा प्रस्ताव पाठवून राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. यामध्ये 400 मीटरचा ट्रॅक तयार करावयाचा आहे.

मैदानी खेळासाठी सुसज्ज मैदान उभारले जाईल. जमिनीचे सपाटीकरण करून संरक्षित भिंत उभा करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल. या क्रीडा संकुलाला विस्तीर्ण जागा मिळाली आहे. त्यामुळे खेळाबरोबर विविध कार्यक्रमही येथे घेता येईल. आजरा तालुक्‍याच्या सौंदर्यात भर घालणारे संकुल करू.'' जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी माहिती दिली.

या वेळी महावितरणचे अभियंता दिवटे, राजेंद्र सावंत, विजय थोरवत, निवृत्त मंडल कृषी अधिकारी सी. डी. सरदेसाई, कॉन्ट्रॅक्‍टर सुधीर कुंभार, भगवान पाटील, शाखा अभियंता सागर कुंभार, जितेंद्र भोसले, युवराज पाटील, संतोष भाटले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुका क्रीडा अधिकारी बरबडे यांनी स्वागत करून आभार मानले. 

हेलिपॅडची सुविधा 
हे क्रीडा संकुल सुसज्ज असेल. येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड ही असेल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Crore new Proposal For Aajra Sports Complex Kolhapur Marathi News