भारीच... ! 67 टक्के रुग्ण "बॅक टू होम'

67 Percent Corona Patients Are Healed In Gadhinglaj
67 Percent Corona Patients Are Healed In Gadhinglaj
Updated on

गडहिंग्लज : राज्य आणि देशात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस भर पडत असताना दुसऱ्या बाजूला गडहिंग्लज उपविभागासाठी मात्र दिलासादायक बातमी समोर आली आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यांतील 228 पैकी 155 रुग्णांवर आरोग्य यंत्रणेने यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. रुग्ण बरे झाल्याचे प्रमाण सरासरी 67 टक्के इतके आहे. विशेष म्हणजे स्थानिक संसर्गाला थोपवण्यात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनातील सर्व घटक आणि प्रभाग समिती, ग्राम दक्षता समिती, नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. 

तीन ते चार आठवड्यांत गडहिंग्लजला 80 आणि आजरा व चंदगडला प्रत्येकी 74 असे 228 रुग्ण आढळले. यांतील बहुतांशी रुग्णांवर त्या त्या तालुक्‍यांतील कोविड केअर सेंटरमध्येच उपचार सुरू आहेत. अनेक रुग्णांमध्ये लक्षणेही नव्हती. संबंधित तालुक्‍यातील आरोग्य विभागाचे डॉक्‍टर्स, स्टाफ नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी रात्रीचे दिवस करून बाधित रुग्णांची देखभाल केली. मानसिक बळ दिले. वैद्यकीय उपचारासह शारीरिक प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आहारावर भर दिला.

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनीही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशन केले. या साऱ्याचा परिणाम म्हणून की काय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतक्‍या झपाट्याने वाढले की, गडहिंग्लजला आजअखेर हे प्रमाण 80, चंदगडला 67 आणि आजऱ्यात 50 टक्‍क्‍यांवर आणण्यात यश आले आहे. आता केवळ 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा उपविभाग आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जूनअखेर हे यश मिळेल याचा आशावाद प्रशासनाला आहे. 

डोळ्यांत तेल घालून काम
आरोग्य विभागाचे यात मोठे योगदान आहे. ग्राम दक्षता समिती, प्रभाग समिती, ग्रामपंचायत, नगरपालिकांनी आपापल्या पातळीवर उत्कृष्ट काम केल्याने स्थानिक संसर्गाला थोपवणे शक्‍य झाले. प्रशासनातील सर्वच विभागांनी डोळ्यांत तेल घालून काम केले. नागरिकांनीही प्रशासनाला साथ दिली. 
- विजया पांगारकर, प्रांताधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com