esakal | यंदा लग्नाचे दोन प्रकारांचे आहेत ७७ मुहूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

77 muhurat this year  it will be convenient for the parents of the bride and groom to find the nearest

पालकांची गैरसोय टळणार; कॅटरर्स, कार्यालय बुकिंगसाठी लगबग

यंदा लग्नाचे दोन प्रकारांचे आहेत ७७ मुहूर्त

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : यंदा २६ नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नसराई सुरू होईल. या वर्षात तब्बल ७७ मुहूर्त असल्याने वधू-वरांच्या पालकांना जवळचा मुहूर्त शोधणे सोयीचे होणार आहे. यंदा राजयोग व साधे मुहूर्त (गौणकालमुहूर्त) असे दोन प्रकारांतील मुहूर्त आहेत. राजयोग मुहूर्त ४७ आहेत, तर साधे मुहूर्त ३० इतके आहेत. दाते पंचांगानुसार असे एकूण ७७ मुहूर्त यंदा आहेत. 
कोरोनामुळे मार्चपासून तीन महिने विवाह झालेच नाहीत. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही विवाह झाले. मात्र, अनेकांनी विवाह पुढे ढकलले. यंदा राजयोग मुहुर्तांना नोव्हेंबर २७ पासून सुरवात झाली. 


साध्या मुहूर्ताला जानेवारीपासून सुरवात झाली आहे. राजयोग मुहूर्त जुलैपर्यंत आहेत, तर साधे मुहूर्त एप्रिलपर्यंत आहेत. धार्मिक पर्यटन असो वा इतर पर्यटनस्थळे असो, अजूनही सरकारने मुभा दिली नाही. शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा रुळावर आलेला नाही; पण मुलांचे योग्य वयात विवाह उरकावेत, ही पालकांची इच्छा असते. त्यामुळे सहा महिन्यांत पुढे ढकललेले विवाह सोहळे सुरू होतील. अनेकजण मंगल कार्यालय, कॅटरर्स, डेकोरेशन बुकिंग करत आहेत. 

हेही वाचा - कोरोना लस येण्यापूर्वीच कर्नाटकात केंद्रांची तयारी -

यंदाचे लग्नमुहूर्त असे :
राजयोग मुहूर्त ः  नोव्हेंबर २७, ३० 
 डिसेंबर ७, ९, १७, १९, २३, २४ 
 जानेवारी ३, ६, ७, ८, ९, १० 
 फेब्रुवारी १५, १६ 
 एप्रिल २२, २४, २५, २६, २९, ३० 
 मे १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २२, २४, २६, २८, ३०, ३१ 
 जून ४, ६, १६, १९, २० २६, २८ 
 जुलै १, २, ३, १३ 
साधे मुहूर्त 
 जानेवारी १८, १९, २०, २१, २४, २५, ३० 
 फेब्रुवारी १, २, ३, ४, ८, २१, २२, २६, २७, २८, 
 मार्च २, ३, ५, ७, ९, १०, १५, १६, ३० 
 एप्रिल १, ५, ६, ७, 

तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नकार्याना सुरुवात होईल. यंदा राजयोग व साधे असे दोन प्रकारांतील विवाह मुहूर्त आहेत. एकूण ७७ विवाह मुहूर्त आहेत. लॉकडाउनमुळे अडकलेली लग्नकार्य मुहूर्तानुसार पार पाडण्यास हरकत नाही. 
- प्रशांत अर्जुनवाडकर, ज्योतिषी

संपादन - अर्चना बनगे

go to top