नवी दिल्ली सोने तस्करी प्रकरण : ‘एनआयए’ चा सांगली जिल्ह्यात पुन्हा छापा ; आठ जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

तालुक्‍यातील एकाची कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र,

सांगली :  नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सोन्याची तस्करी करताना आठ जणांना अटक करण्यात आली होती. ते आठही जण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील असल्याचे स्पष्ट झाल्यावर सीमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक्‍यात छापे टाकले होते. त्यानंतर आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) दहा जणांच्या पथकाने खानापूर तालुक्‍यात छापे टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.

 
तालुक्‍यातील एकाची कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, याबाबतची अधिक माहिती समजू शकली नाही.माहिती अशी, की २८ ऑगस्टला नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावरून आठ जणांकडून ४२.८९ कोटी रुपयांची ८३.६२४ किलो वजनाची ५०४ सोन्याची बिस्किटे ‘डीआरआय’ने जप्त केली होती. आठही संशयित सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यातील असल्याचे स्पष्ट झाले. संशयितांनी म्यानमार येथून मणिपूरच्या सीमेवरून सोन्याची तस्करी केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने संशयित नेहमीच या मार्गाने सोने तस्करी करीत असावेत, असा संशय व्यक्त केला जात त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

हेही वाचा- आजऱ्यातील 26 गावांना आता पुढच्या वर्षीच कारभारी 

 

दरम्यान, या प्रकरणी आज ‘एनआयए’चे दहा जणांचे पथक सांगलीत दाखल झाले. तालुक्‍यातील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. शिवाय, अटक केलेल्या आठ संशयितांमागे असलेल्या सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. त्यातून सोनेतस्करी करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action of the NIA squad Raids in Khanapur in Delhi gold smuggling case