कृषी पदवी, उद्यानविद्याचे विद्यार्थी आपल्याच गावात करताहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कोविडमुळे पहिल्याच संधी

Agriculture Students Are Guiding The Farmers In Their Own Village Kolhapur Marathi News
Agriculture Students Are Guiding The Farmers In Their Own Village Kolhapur Marathi News

दानोळी : महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठअंतर्गत असणाऱ्या सर्व कृषी पदवी (ऍग्रीकल्चर) व उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) विद्यार्थी सातव्या सत्रात (सेमिस्टर) प्रत्यक्ष शेतात जाउन मार्गदर्शन करीत असतात. ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्यागिक जोड (रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावात सहा महिने हा उपक्रम राबवयाचा असतो. यावर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना स्वत:च्या गावात हा उपक्रम राबविण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील 130 महाविद्यालयांचे 10 हजार 500 विद्यार्थी आपल्या गावात प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. 

राज्यामध्ये प्रत्येकवर्षी चार-पाच कृषीदूत व कृषिकन्या एकत्रित गट करून सहा महिने शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, किड-रोग व्यवस्थापन, कृषी मेळावे तसेच विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत 20 पेक्षा अधिक प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पोहचवितात. त्यासाठी महाविद्यालयाच्या 50 किलोमीटर परिक्षेत्रातील गावाची निवड केली जाते,

यावर्षी कोविड-19 मुळे विद्यार्थी ज्या गावात स्थायिक आहेत, त्याच गावात त्याने कृषिदूत/कृषकिन्या म्हणून काम करण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. त्यानुसार कृषीच्या विद्यार्थ्यांचे काम सुरू असून, आपल्याच गावातील विद्यार्थी आपल्याला मार्गदर्शनासाठी येत असल्याचा नवीन अनुभवही शेतकऱ्यांना मिळत आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालय ऑनलाईन मार्गदर्शन करीत आहे. 

विद्यापीठाच्या सूचनेनुसार उपक्रम
कृषी अभ्यासक्रमाच्या सुरवातीपासून महाविद्यालयाने दिलेल्या गावात विद्यार्थी मार्गदर्शन करीत आले आहेत. या वेळी कोरोनामुळे विद्यापीठाच्या सूचनेनुसार आपल्या गावातच हा उपक्रम राबविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. विद्यार्थी सचोटीने काम करून संधीचे सोने करीत आहेत. 
डॉ. शांतिकुमार पाटील, प्राचार्य, शरद कृषी महाविद्यालय 

खूप शिकायला मिळते
महाविद्यालयाने गावात "रावे'अंतर्गत मार्गदर्शन करण्याची संधी दिली आहे. आपल्या स्वत:च्या गावात आपल्या शेतकऱ्यांसोबत काम करताना उत्साह येतो. आम्हालाही खूप शिकायला मिळते. 
रोहन शिर्के, विद्यार्थी, राधाळे, फलटण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com