"कोरोना'मुळे आजऱ्यात 40 कोंटीचा फटका

In Ajara 40 Crore Loss because Of "corona"  Kolhapur Marathi News
In Ajara 40 Crore Loss because Of "corona" Kolhapur Marathi News

आजरा : जगभर "कोरोना' विषाणुने थैमान घातले आहे. याचे प्रत्यक्ष परिणाम आजऱ्यापर्यंत येवून पोहोचले आहेत. चिकन खाल्यामुळे कोरोनाची लागन होते अशा अफवा व गैरसमजातून गोव्याकडून होणारी पक्षांची मागणी घटली आहे. पक्ष्यांचे दर ही कोसळले आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगावर संक्रातच आली आहे. आजरा तालुक्‍यात गेल्या महिनाभरात पोल्ट्रीधारकांचे सुमारे चाळीस कोटींचे नुकसान झाल्याचे पोल्ट्री व्यवसायिकांकडून सांगण्यात येते.

शासनाने मदत देण्याबरोबरच कोरोनाबाबत पसरलेल्या अफवा व गैरसमज दुर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. आजरा तालुक्‍यात या वीस वर्षात पोल्ट्रीचा उद्योग फोफावला. बेरोजगार युवकांनी बॅंक व अन्य आर्थिक संस्थाकडून कर्ज घेवून पोल्ट्री फॉर्म उभारले. दुग्ध व्यवसायापेक्षा अधिक उलाढाल करणारा हा उद्योग येथील अर्थकारणाची नाडीच बनला आहे. तालुक्‍यात सुमारे पाचशे पोल्ट्री फार्म आहेत. या उद्योगातून शेकडो तरूणांना रोजगार मिळाला असून अनेकांना स्थैर्य देखील मिळाले आहे. यावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत.

पक्ष्यांना गोवा बाजारपेठेतून मोठी मागणी असल्याने या उद्योगाला चालना मिळाली आहे, पण कोरोना या विषाणूचा फैलाव जगभर सुरू झाल्यावर पोल्ट्री व्यवसायावर कुऱ्हाडच कोसळली आहे. चिकन खाल्यामुळे कोरानाची लागण होत असल्याचा गैरसमज व अफवा पसरल्यामुळे गोव्याहून होणारी कोंबड्याची मागणी घटली आहे. पक्ष्यांचे दरही दर घसरले आहेत. पक्षांचे खाद्य मिळेना. खाद्याचे दरही वाढले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर या उद्योगावर आलेले संकट चिंताजनक आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असून अशीच स्थिती राहिल्यास अनेकांना रोजगार देणारा हा उद्योग मोडकळीस येईल, असे पोल्ट्रीधारक सांगत आहेत. 

अफवेमुळे फटका
या उद्योगात मोठी आर्थिक गुंतवणुक केली आहे. बॅंकांकडून कर्ज घेतली आहेत. 200 जणांना रोजगार दिला असून 290 फॉर्मर यांनी इंटीग्रेशन केले आहे. कोरोनाच्या अफवेमुळे दहा कोटींचा फटका बसला आहे. आर्थिक कंबरडेच मोडले असून शासन पातळीवरून उद्योगाला मदत मिळण्याची गरज आहे. 
- उत्तम रेडेकर, उद्योजक, अंकिता पोल्ट्री फिडस व मनाली इंटरप्रायझेस, पेद्रेवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com