"मनसे'चा महावितरणवर मोर्चा 

रणजित कालेकर
Tuesday, 18 February 2020

आजरा पुरग्रस्त शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे, वाढीव वीज बिल कमी करून द्यावीत, वीज जोडण्या तात्काळ द्याव्यात यासह विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आजरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणुक तातडीने न केल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसु दिले जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. 

आजरा : पुरग्रस्त शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे, वाढीव वीज बिल कमी करून द्यावीत, वीज जोडण्या तात्काळ द्याव्यात यासह विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आजरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणुक तातडीने न केल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसु दिले जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. 

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरवात झाली. मुख्य बाजारपेठ, संभाजी चौक मार्गे मोर्चा महावितरण कार्यालयावर पोहोचला. या वेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, ""अतिवृष्टीमध्ये पुरग्रस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यात मोटारी बुडाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला. त्यांना वीजेची बिले भरता येणे कठीण आहे. त्यांची वीज बिल माफ करावीत. ज्या शेतकऱ्यांना वाढीव बिले आली आहेत, ती कमी करून द्यावीत. सरकारने पाच दिवसाचा आठवडा करत आहे.

त्यामुळे सोमवारी वीज खंडीत न करता शनिवारी करावी, वीज जोडण्या तात्काळ दिल्या जाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे व शेतकऱ्यांची या वेळी भाषणे झाली. यानंतर महावितरणचे अधिकारी दिवटे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या वेळी तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे, ईश्‍वरा गुरव, आप्पा गुरव, वसंत घाटगे, वैभव येसणे, सुनिल निऊंगरे, अजय येसणे, विजय येसणे, शैलेश निऊंगरे, अतिश कातकर, सुदर्शन पोवार, मारूती शिंदे, धोंडीबा कुंभार, कृष्णा मोहीते, चंद्रकांत सांबरेकर, कृणाल पोतदार, म्हंकाळी चौगुले, प्रदिप पाटील यासह मनसेचे पदाधिकारी व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajara Maharashtra Navnirman Sena Andholan