आधी गटरी करा; मग रस्त्यांचे बघा, आजऱ्यातील सभेत सूचना

Ajara Nagar Panchayat Meeting Kolhapur Marathi News
Ajara Nagar Panchayat Meeting Kolhapur Marathi News

आजरा : शहरातील गटर्स नादुरुस्त झाली असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. काही ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. चौदावा वित्त आयोग व नगरपंचायत निधीतून शहरातील गटर्सची कामे प्राधान्याने करावीत. पुढील मासिक सभेपुर्वी कामांचा प्रारंभ झाला पाहिजेत, अशी सुचना आजरा नगरपंचायत सभेत नगरसेवकांनी केल्या. या वेळी शहरातील खुल्या जागा, पाणी यांसह विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. 

वरिष्ठ लिपिक संजय यादव यांनी स्वागत केले. आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरसेविका यास्मिन बुड्डेखान यांचा सत्कार झाला. नगरसेवक विलास नाईक यांनी चौदाव्या वित्त आयोगातून गटर्ससाठी किती निधी वापरता येईल याची विचारणा केली. हाच धागा पकडत नगरसेवक अशोक चराटी, संभाजी पाटील, बशीर दरवाजकर, सीमा पोवार यांनी रस्त्याची कामे मागे राहिली तरी चालतील, पण गटर्सची कामे तातडीने करावीत. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्याचा निचरा होण्यासाठी प्राधान्याने गटर्सची कामे करावीत, अशी सुचना केली. 

शहरातील खुल्या जागा (ओपन स्पेस) अजून ताब्यात घेतल्या नाहीत. याबाबत कोणतेही अधिकार वापरा, पण या जागा ताब्यात घ्या अशी सूचना नाईक यांनी केली. त्यांनी कर्मचारी समायोजनाबाबतही विचारणा केली. नगरसेविका यास्मिन बुड्डेखान यांनी मदरसा व साई कॉलनीतील पाणी प्रश्‍नाबाबत विचारणा केली. मुस्लीम वस्तीमधील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्याचे बांधकाम अभियंता सुधीर पोतदार यांनी सांगितले. सर्व मुस्लीम नगरसेवकांनी एकत्रीत बोलवून त्यांच्या प्रभागात निधी खर्च करण्याबाबतचे नियोजन करावे, अशी सूचना चराटी यांनी केली. 

पाणीपुरवठा सभापती शुभदा जोशी यांनी कब्बड्डी स्पर्धेबाबतच्या चर्चेवेळी समिती गठीत केली काय? अशी विचारणा केली व सदस्यांची माहिती द्यावी, असे सांगितले. अस्मिता जाधव यांनी पथदिव्यांच्या नियोजनाबाबतचा प्रश्‍न मांडला. शिक्षण सभापती किरण कांबळे यांनी आरोग्य, वीज व पाणी याबाबत कोणतही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक अनिरुध्द केसरकर, रेश्‍मा सोनेखान, बांधकाम सभापती शकुंतला सलामवाडे, किशोर पारपोलकर, यासीराबी लमतुरे, संजीवनी सावंत यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

विकास आराखड्यासाठी एजन्सी 
शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नेमण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुत्तकेकर यांनी दिली. याबाबत नगरसेवकांना माहिती दिली नसल्याचे चराटी यांनी सांगितले. आराखड्याशिवाय कामे होणार नाहीत, तर कामासाठीचा पाठपुरावा प्रशासनाने करावा, असे चराटी यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com