...आणि कुळ म्हणून राबणारे शेतकरी झाले मालक!... 'या' तालुक्यातील 700 शेतकऱ्यांच्या नावे 7/12 उतारा

...And Farmers Who Live As Clans Became Owners! Kolhapur Marathi News
...And Farmers Who Live As Clans Became Owners! Kolhapur Marathi News
Updated on

चंदगड : नागनवाडी (ता. चंदगड) महसूल मंडल अंतर्गत नागनवाडी, कुर्तनवाडी, गंधर्वगड, दाटे, गुडेवाडी व वरगाव या सहा गावांतील सुमारे 700 खातेदारांना आज जमिनीच्या सात बारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. हेरे सरंजाम अंतर्गत पिढ्यान्‌पिढ्या कुळ म्हणून राबणारे शेतकरी आज मालक झाले. उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते स्वतःच्या नावचे उतारे मिळताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. 

हेरे सरंजाम अंतर्गत कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची सात बारा पत्रकी वर्ग दोनचे भोगवटादार म्हणून नोंद होती. संस्थान खालसा होऊन 80 वर्षे होत आली तरी या जमिनी सरंजामच्याच नावे होत्या. यासाठी तत्कालीन आमदार कै. नरसिंगराव पाटील यांनी विधानसभेत कायदा संमत करून घेतला. त्यानुसार जमिनीच्या आकाराच्या 200 पट रक्कम भरून या जमिनी संबंधित कुळाच्या नावे करण्याचा निर्णय झाला. परंतु महसूल विभागाकडून त्याची अंमलबजावणी होत नव्हती.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून तो मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक मंडलनिहाय उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करून तातडीने या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज नागनवाडी मंडलमधील शेतकऱ्यांना त्यांच्या नावच्या सात बारा उताऱ्यांचे वाटप केले. या वेळी अव्वल कारकून बाबूराव खोत, मंडल अधिकारी बाळोसो देसाई, तलाठी सुधाकर देसाई, राजश्री पचंडी, वैभव कोंडेकर, शिवदास वाघामारे, दीपक कांबळे, गणेश ठोसरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह खातेदार शेतकरी उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com