कोरोनाशी लढणार आता 'ही' गोळी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी अद्याप औषध नाही. सध्या उपलब्ध असलेली औषधे केवळ त्याची घातक क्षमता कमी करू शकतात. कोरोना विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याला रोखण्याचे काम शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती करते.

बेळगाव - कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी. यासाठी आता राज्य शासनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपथी औषध वापराचा पर्याय पुढे आणला आहे. शासनाच्या आयुष विभागाने ""अर्सेनिक अलबम-30"" नामक औषध कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याने म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी अद्याप औषध नाही. सध्या उपलब्ध असलेली औषधे केवळ त्याची घातक क्षमता कमी करू शकतात. कोरोना विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याला रोखण्याचे काम शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती करते. ही रोगप्रतिकारकता कमी असल्यास कोरोनाचा प्रभाव अधिक जाणवतो. ज्यामुळे कोरोणाबाधित व्यक्ती दगावण्याची देखिल शक्‍यता असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही शक्ती कमी असल्यानेच कोरोग्रस्तांमध्ये मृत पावणाऱ्यांत 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक अधिक आहेत. त्यामुळे अशा रुग्णांसह रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांमध्ये देखिल ती वाढविणे आवश्‍यक ठरले आहे. 

राज्य शासनाच्या आयुश विभागाने हीच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे औषध विकसीत केले आहे.

हे पण वाचा - मोठा दावा!  कोरोनावर आहे या थेरेपीचा पर्याय

 "अर्सेनिक अलबम-30"" नामक हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करणार आहे. तीन दिवस रोज सकाळी मोठ्यांनी उपाशीपोटी या सहा गोळ्या तर लहान मुलांना 4 गोळ्या देणे आवश्‍यक आहे. पुन्हा एक महिन्यानंतर हा कोर्स तीन दिवसाचा करायचा आहे. तर पुन्हा पुढे कोर्स करणे आवश्‍यक असल्यास होमीओपॅथी प्रॅक्‍टीशनर्सचा सल्ला घ्यावा, असेही सुचविण्यात आले आहे. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी जरी औषध मिळाले नसले तरी त्याच्याशी लढा देण्यास आवश्‍यक रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधे आता उपलब्ध होऊ लागली आहेत.

हे पण वाचा -  कोरोना विरुद्ध लढ्यात थर्मल स्क्रिनिंगचे हत्यार!

अर्सेनिक अल्बम औषधे आंध्रप्रदेशात शासनाकडूनच वितरीत केली जात आहेत. कर्नाटकात दोन दिवसापूर्वी आयुष विभागासोबत झालेल्या संवादात ही औषधे उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा दर देखिल माफक आहे. बेळगावात देखील त्याचा साठा उपलब्ध असून एका कुटुंबाला एक बाटली पुरेसी आहे. होमीओपथी स्टोअर्समध्ये ही औषध मिळत आहेत.

-डॉ. सोनाली सरनोबत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arsenic Album 30 effects on COVID 19