esakal | अन् ऑटो रिक्षातच झाला बाळाचा जन्म...
sakal

बोलून बातमी शोधा

The baby was born in the auto belgum

कोरोनामुळे सध्या शहरातील बहुतांशी खासगी हॉस्पिटल बंद आहेत. यामुळे सर्वांनाचा याचा फटका बसत आहे.

अन् ऑटो रिक्षातच झाला बाळाचा जन्म...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - हट्टीहोळी गल्ली, शहापूर येथे ऑटो रिक्षात एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना शनिवारी (ता.18) सकाळी 8.30 वाजता घडली. यानंतर याच गल्लीतील एका खासगी हॉस्पिटध्ये पुढील तपासणी करून रुग्णाला घरी पाठवून देण्यात आले.

कोरोनामुळे सध्या शहरातील बहुतांशी खासगी हॉस्पिटल बंद आहेत. यामुळे सर्वांनाचा याचा फटका बसत आहे. अशाच फटका वडगाव येथील या महिलेला बसला आहे. वडगाव येथील विशिष्ट समाजातील त्या महिलेला सकाळी 8 च्या सुमारास अचानक त्रास सुरु झाला. यामुळे हट्टीहोळी गल्लीतील एका खासगी रुग्णालयात विचारणा केली असता आमच्याकडे प्रसुती विभाग नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना तिची हट्टीहोळी गल्लीत त्याच रिक्षात 8.30 च्या दरम्यान प्रसुती झाली. हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी यावेळी सहकार्य केले. त्यानंतर इतर तपासणी त्या खासगी रुग्णालयातच करण्यात आली. सध्या बाळंतीन व बाळ सुखरुप असून डॉक्‍टरांकडून त्यांना जिल्हा रुग्णालयात घेऊन जायचा सल्ला देण्यात आला. मात्र, दोघेही ठणठणीत असल्याने ते आपल्या घरी गेले.