बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांना मिळाला 'इतका' कालावधी

सतीश जाधव
Thursday, 6 August 2020

पंधरादिवसांपूर्वी कॅण्टोन्मेंट बोर्डातर्फे निवडणुकीची तयारी म्हणून मतदारांची नावनोंदणी तसेच मतदान ओळखपत्रातील चुकांची दुरुस्ती केली जात होती.

बेळगाव - कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यांना सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. यामुळे 12 फेब्रुवारीपर्यंत सदसत्व राहणार आहे. यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून सदरचे पत्र कॅण्टोन्मेंट बोर्डाला मिळाले आहे. 

कॅण्टोन्मेंट बोर्ड सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी 12 फेब्रुवारीला 2020 पूर्ण झाला होता. त्यावेळी निवडणूक होणार नाही, असे कारण देत सहा महिने निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सदरचा वाढीव कालावधी 12 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार होता. ऑगस्ट महिना उजेडला तरी देखील कोणत्याच हालचाली होत नव्हत्या. यासंबंधी 29 जुलै रोजी 'सकाळ'मध्ये कॅण्टोन्मेंट सदस्यांना वाढीव कालावधी?' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. 'सकाळ'चा हा अंदाज खरा ठरला असून सदस्यांना पुन्हा सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. 

वाचा - पंचगंगा धोक्‍याच्या पातळी जवळ ; रेडेडोह फुटलाआंबेवाडी, चिखली गावात स्थलांतराची हालचाल सुरू... 

यापूर्वी कॅण्टोन्मेंट बोर्डातर्फे दोन वेळा बोर्डाच्या सदस्यांना सहा महिने व एक वर्षाचा वाढीव कालावधी मिळाला होता. पुन्हा एक वर्षाचा वाढीव कालावधी मिळाला आहे. गत पंधरादिवसांपूर्वी कॅण्टोन्मेंट बोर्डातर्फे निवडणुकीची तयारी म्हणून मतदारांची नावनोंदणी तसेच मतदान ओळखपत्रातील चुकांची दुरुस्ती केली जात होती. मात्र, आठ दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने हे काम थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे सदस्यांना सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. यापूर्वी प्रभागाचे आरक्षण काढण्यात आले आहे. त्यानुसार एकूण सात प्रभागापैकी 4 व 6 क्रमांकाचा प्रभाग महिलांसाठी, 7 क्रमांकाचा प्रभाग अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव आहे. तसेच अन्य चार प्रभाग सामान्यसाठी खुले आहेत. मात्र, फ्रेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक होणार असल्याने सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आलेले आरक्षण असणार की पुन्हा आरक्षण काढण्यात येणार हे त्याचवेळी स्पष्ट होणार आहे. बोर्डाची सदस्य संख्या सात असून एकूण 10,084 मतदार आहेत. 

बेळगाव : लाघ घेताना बील कलेक्टर लाचलुचपतच्या जाळ्यात

 

लोकनियमुक्त सदस्यांचा 12 ऑगस्ट रोजी कार्यकाल पूर्ण होणार होता. सदस्यांना पुन्हा सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. यापूर्वी सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. निवडणुकीसंबंधी संरक्षण मंत्रालयाकडून पत्र आले आहे. 
- बर्चस्वा, सीईओ, कॅण्टोन्मेंट बोर्ड
 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum Cantonment Board members get more period