बेळगाव जिल्हा 36 तास संपूर्ण सीलडाऊन राहणार...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

राज्य सरकारने 31 पर्यंत कोरोना लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात सर्वांनी कटाक्षाने नियम पाळण्याची गरज आहे.

बेळगाव - शनिवार (ता.23) सायंकाळी 7 ते सोमवार (ता.25) सकाळी 7 पर्यत 36 तास शहरासह जिल्ह्यात सीलडाउन घोषीत करण्यात आले आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पुर्ण पणे बंद राहतील. रविवारी संपुर्ण दिवस सीलडाउन असणार असल्याने कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्यथा संबधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. असा इशारा पोलीस आयुक्‍त बी. एस. लोकेशकुमार यांनी दिला आहे.

राज्य सरकारने 31 पर्यंत कोरोना लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात सर्वांनी कटाक्षाने नियम पाळण्याची गरज आहे. लॉकडाउन काळात दररविवारी संपुर्ण दिवस लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. याकाळात मुख्य महामार्ग, रस्ते, अंतर्गत रस्ते बॅरिकेड्‌स लाउन पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. शहरासह जिल्ह्यात प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करुन त्याठिक़ाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडत रस्त्यावर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. केवळ पुर्व नियोजित लग्न, समारंभाला परवानगी देण्यात येणार आहे. धार्मिक, राजकिय सभा समारंभाणा पुर्णपणे निर्बंध असणार आहेत.

वाचा - क्वारंटाईन...छे !, हे तर मुंबईकरांचे घरच...

विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नये, अन्यथा त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल असा कडक इशारा देण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव होउ नये, यासाठी दररोज सायंकाळी सहानंतर शहरातील सर्व व्यवहार बंद करण्यात येत आहेत. मात्र, उद्या रविवार असल्याने आज सायंकाळी सात पासून सोमवार (ता.24) सकाळी सातपर्यंत संपुर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे 36 तास सीलडाउन असणार आहे. सकाळी 9 पर्यंत दुध घरोघरी जाउन दुध पुरवठा करण्यात यावा, त्यानंतर कोणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही. औषध दुकाने सुरु असतील पण, कोणीही घराबाहेर पडून नये, अन्यथा संबधीतावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

रविवारी संपर्ण दिवस सीलडाउन असणार आहे. आज सायंकाळी सात पासून सोमवारी सकाळी सात पर्यंत कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, 36 तास सीलडाउनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात येणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करुन गुन्हे दाखल करण्यात येतील.
- बी. एस. लोकेशकुमार, पोलीस आयुक्‍त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum district will be completely sealed down for thirty six hours