
महाडिक गटाचे सभापती जगन्नाथ माळी हेही कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमावर राष्ट्रवादीची छाप राहिली.
सांगली : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी आज मॉडेल स्कूल उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवली. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, एकमेव सभापती सुनिता पवार हे कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. खासदार संजय पाटील यांनी मात्र येथे हजेरी लावली. भाजपचे काही सदस्य आवर्जून हजर होते.येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. तेथे अध्यक्ष बदल व्हावा, यासाठी भाजपमधील नाराजांनी ताकद लावली आहे. रविवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठकही झाली. त्यावेळी संजय पाटील अगदी काही मिनिटांसाठी हजेरी लावून गेले. त्याचीही काल चर्चा रंगली. आजच्या कार्यक्रमातील भाजप जणांची गैरहजेरी मात्र लक्षात येण्यासारखी होती. या कार्यक्रमात खासदार गटाचे सभापती प्रमोद शेंडगे आणि घोरपडे समर्थक सभापती आशा पाटील यांची हजेरी होती.
हेही वाचा- आयत्या बिळावर नागोबा : पाटील यांचा कसला पुरुषार्थ ?
महाडिक गटाचे सभापती जगन्नाथ माळी हेही कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमावर राष्ट्रवादीची छाप राहिली.अलिकडे खासदार पाटील यांची पालकमंत्री जयंतरावांशी जवळीक वाढल्याची चर्चा रंगते आहे. महापालिकेत महापौर बदलाबाबतही वेगवेगळ्या चर्चांना रंग भरला आहे. अशावेळी संजयकाकांनी भाजपच्या बैठकांकडे पाठ फिरवावी आणि जयंतराव जिथे हजर तेथे हजेरी लावावी, याचीही चर्चा रंगात आली आहे. ""मी येथे आलो, याचा वेगळा अर्थ काढू नका. चांगल्या उपक्रमाला माझा पाठींबाच आहे', असे संजय पाटील यांनी आवर्जून भाषणात सांगितले.
मी भाजपशी प्रामाणिक
भाजपचे आमदार आले नसले तरी खासदार संजय पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. जयंतरावांशी त्यांनी दीर्घकाळ संवादही साधला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ""जिथे चांगले कार्यक्रम होतात, तेथे पक्ष, गट-तट बाजूला ठेवून मी जातो. त्यात चुकीचे काही नाही. मी भाजपशी प्रामाणिक आहे. मी कुठे निघालेलो नाही. मी जावे, असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा विषय आहे. मी भाजपशी प्रामाणिक आहे.''
-ऍड. संदेश पवार, कार्यवाह, उगम फौंडेशन
संपादन- अर्चना बनगे