लॉक डाउनच्या काळात जोतिबा भक्ताने लिहले 'छबिना' हे पुस्तक....

निवास मोटे
मंगळवार, 30 जून 2020

 
पुस्तक भाविकांना मोफत ; पुस्तक रूपीदेणगी जोतिबा तीर्थक्षेत्र संर्वधनासाठी...

जोतिबा डोंगर - महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,  गुजरात या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दख्खनचा राजा श्री.जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा कोरोनामुळे झाली नाही. परिणामी सर्रास भाविकांना जोतिबा डोंगरावर येता आले नाही. आपल्या कुलदैवताच्या दर्शनाची ओढ वडूज येथिल एका जोतिबा भक्ताला लागली आणि त्यांनी दर्शनाच्या ओढीने आपल्या जीवनातील जोतिबा देवा विषयी असणारे प्रसंग त्यांनी लॉक डाऊन काळात एका पुस्तक रूपात मांडले. त्या पुस्तकाचं नाव आहे छबिना. भक्ताचे नाव आहे राहुल कुमार खडके. वडूज तालुकाखटाव जिल्हा सातारा.

 या पुस्तकाचे प्रकाशन ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेच्या दरम्यान करण्यात येणार असून हे पुस्तक भाविकांना मोफत देण्यात येण्यात येणार आहे. भाविकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेल्या देणगीतून जोतिबा तिर्थक्षेत्र विकास संवर्धनाची कामे केली जाणार आहेत. तसेच चाफेबन मोहिम, जमदानी तीर्थ संगोपन, यमाई मंदिर परिसर स्वच्छता मोहीम या कामासाठी निधीची मदत होणार असल्याचे श्री खडके यांनी सांगितले.

वाचा - जोतिबा डोंगरावर वर्षा पर्यटनासाठी 'हे' खास पाॅईंट पण यंदा कोरोनाने प्लॅन फसला...

राहुल कुमार खडके स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअर असून मेरीटाइम फाउंडेशन ट्रस्ट चेन्नई तामिळनाडू येथे कार्यरत आहेत. ते आर. जे. के एक्सपोर्ट्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, आज एकविसाव्या शतकात कम्प्युटर व प्रगत विज्ञान युगात निसर्गात अशा अशा अनेक घटना घडतात कि त्याची उत्तरे विज्ञानलाही सापडले नाहीत. भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे.

श्री खडके यांच्या २४ वर्षाच्या काळात घडलेल्या घटना,प्रचिती, अनुभवांचे चित्र त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.हे पुस्तक दख्खन केदार सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार असून ते राज्यभरातील भाविकांच्या पर्यंत पोहोचले जाणार आहे. भाविकांनी दिलेला निधीही या तीर्थक्षेत्र विकास संर्वधनासाठी वापरला जाणार असल्याचे खडके यांनी सांगीतले.

माझे कुलदैवत जोतिबा.जोतिबा देवाच्या कृपा आर्शिवाद मी घडलो. यंदा चैत्र यात्रेला मला जाता आले नाही. देवाच्या दर्शनाच्या ओढीने मी सत्य घटनेवर आधारित छबीना पुस्तक लिहीले. पुस्तकातून येणारा सर्व निधी मी तिर्थक्षेत्र संर्व धनासाठी वापरणार आहे. 

राहूलकुमार खडके - वडूज जि.सातारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The book Chabina was written by Jyotiba Bhakta during the lock down