बेळगावकर 'या' गोष्टीची तुम्ही काळजीच करु नका....

Both the reservoirs supplying water to Belgaum city have adequate water reserves this year
Both the reservoirs supplying water to Belgaum city have adequate water reserves this year
Updated on

बेळगाव - कोरोनामुळे धास्तावलेल्या बेळगावकरांना यंदा पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलाशयांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहराला सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. राकसकोप व हिडकल या दोन जलाशयांमधून शहराला पाणीपुरवठा होतो. यापैकी राकसकोप जलाशयात यंदा गतवर्षीच्या तुलनेत 5 फूट पाणीसाठा जास्त आहे. गतवर्षी 22 एप्रिल रोजी राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी 2456.70 फूट इतकी होती. पण यंदा 22 एप्रिल रोजी जलाशयाची पातळी 2462.00 फूट इतकी आहे. म्हणजे गतवर्षीपेक्षा पाण्याची पातळी पाच फुटांपेक्षा जास्त आहे.

हिडकलमधील पाण्याची मागणी नाही

हिडकल जलाशयाची क्षमता मोठी आहे. शिवाय या जलाशयातील एक टीएमसी पाणी हे पिण्याच्या कारणासाठी राखीव ठेवले जाते. पण यंदा या जलाशयातील पाण्याची पातळीही गतवर्षीच्या तुलनेत चांगली आहे. गतवर्षी 23 एप्रिल रोजी हिडकल जलाशयात 8.53 टीएमसी इतका पाणीसाठा होता. यंदा 23 एप्रिल रोजी जलाशयात 16.38 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. म्हणजेच गतवर्षीच्या दुप्पट पाणीसाठी यंदा हिडकल जलाशयात आहे. त्यामुळे या जलाशयातील पाण्यावर जे शेतकरी अवलंबून आहेत, त्या शेतकऱ्यांसाठीही ही दिलासादायक बाब आहे. गतवर्षी महाराष्ट्र शासनाने कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडले नाही. त्यामुळे कृष्णा काठावरील शेतकरी संकटात सापडले होते. त्यामुळे इतिहासात प्रथमच हिडकल जलाशयातील पाणी कालव्यातून कृष्णा नदीत सोडण्यात आले होते. यंदा कोरोनामुळे पाणीटंचाईचा विषय चर्चेत आलेला नाही, त्यामुळे हिडकलमधील पाण्याची मागणी झालेली नाही.

हिडकल पाणी योजनेच्या सुधारणेचे 32 कोटी रूपयांचे काम

राकसकोप जलाशयाची पाणी साठविण्याची क्षमता केवळ अर्धा टीएमसी आहे. पण हे धरण बेळगावच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्त्रोत आहे. अर्ध्या शहराला या जलाशयातील पाण्याचा पुरवठा केला जातो. गतवर्षी राकसकोप जलाशय दोनवेळा पूर्ण क्षमतेने भरला, त्यामुळे एप्रिल महिना संपत आला तरी त्यातील पाणीसाठा कमी झालेला नाही. दरवर्षी मे महिन्याच्या प्रारंभी राकसकोप जलाशय तळ गाठतो. मे महिन्याच्या मध्यापासून तेथील मृत साठ्यातील पाण्याचा उपसा करण्याची वेळ पाणीपुरवठा मंडळावर येते. पण यंदा तशी स्थिती उद्भवणार नाही असे पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी सांगतात. हिडकल पाणी योजनेच्या सुधारणेचे 32 कोटी रूपयांचे कामही सहा महिन्यापूर्वी सुरू झाले आहे. यामुळे या योजनेची पाणी उपसा क्षमता वाढणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्या आणखी सुधारणा होणार आहे. कोरोनामुळे हे काम सध्या संथगतीने सुरू आहे. पण पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com