भवितव्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांची व्रजमूठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नटून थटून आलेल्या एसटी महामंडळाच्या लालपऱ्या तपोवन मैदानावर आज दाखल झाल्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने येथे आले. एसटी खासगीकरणाच्या उंबरठ्यावर आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे. भविष्यात नोकऱ्यांची अशाश्‍वतता आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर संकटात असलेल्या एसटीला सावरण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार व परिवहन मंत्री ऍड. अनिल परब या अधिवेशनात कोणते भाष्य करतात याची उत्सुकता आहे. 

कोल्हापूर : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नटून थटून आलेल्या एसटी महामंडळाच्या लालपऱ्या तपोवन मैदानावर आज दाखल झाल्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने येथे आले. एसटी खासगीकरणाच्या उंबरठ्यावर आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे. भविष्यात नोकऱ्यांची अशाश्‍वतता आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर संकटात असलेल्या एसटीला सावरण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार व परिवहन मंत्री ऍड. अनिल परब या अधिवेशनात कोणते भाष्य करतात याची उत्सुकता आहे. 

एसटी कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी मिळते. वेतनवाढीपासून ते इतर प्रशासकीय अडीअडचणी दूर होण्यासंदर्भात अधिवेशनात चर्चा होते. भविष्यात आंदोलन करावे लागेल, की नाही, चर्चेतून प्रश्‍न सुट शकतील अशा अनेक उत्सुकता घेऊन कर्मचारी या अधिवेशनाला आले आहेत. त्यासाठी काल दिवसभर रंगीबेरंगी पतका लावून गाड्या सजविल्या. गाडीसोबत सेल्फी काढले गेले. 

काहींनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात गाड्या मार्गस्त केल्या. त्या वाजतगाजत आज दुपारी बारापासून तपोवन मैदानावर आल्या. प्रत्येक विभागातून 40 ते 50 कर्मचारी कमीत कमी 400 ते 450 किलोमीटर अंतराचा प्रवास करून कर्मचारी या अधिवेशनाला आले आहेत. त्यामुळे तपोवन मैदानाचा अवती-भोवतीचा परिसरात संभाजीनगर बसस्थानक एसटी गाड्यांनी भरून गेले. सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेला गर्दी झाली. उद्या (ता.14) अधिवेशनाचा समारोप आहे. 
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध आगारातून तसेच जिल्हा विभाग नियंत्रण कार्यालयाकडून एसटी कर्मचारी आले आहेत. यात अनेकजण पहिल्यांदाच आल्याने त्यांनी आंबाबाईचे दर्शन घेतले. तर काही रात्री जोतिबा, पन्हाळाचा दौरा करण्याचे नियोजन केले आहे. 

कर्मचाऱ्यांचे सामुहिक नृत्य 
मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी तपोवन मैदानावर गर्दी केली. लाऊडस्पीकरवर लावलेली गाणी आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात कर्मचाऱ्यांनी सामुहिक नृत्य करीत जल्लोष केला. 

सोबत जेवणाचे साहित्य 
अधिवेशनाला बहुतांशी एसटी कर्मचारी विदर्भ-मराठवाडा येथून आलेले आहेत. एका गाडीत चाळीस-पन्नास कर्मचारी आहेत. या सर्वांनी सोबत शिधा आणला आहे. अधिवेशन स्थळींच काहींनी जेवण बनवणे सुरू केले. आज दुपारची जेवण बहुतेकांनी सहकाऱ्यांसमवेत केले. त्यासाठी तपोवन मैदानातील अवती भोवतीचे झाडे व त्याखालची मोकळी जागा स्वयंपाक व जेवण करण्यासाठी वापरली. 

फुले, झेंड्यांनी सजल्या गाड्या 
अधिवेशनासाठी मुंबई विभागातून तसेच कोकणातूनही काही गाड्या आल्या आहेत. या गाड्यांवर रंगीबेरंगी फुले हार लावले आहे. तसेच बहुतेक सर्व गाड्यावर संघटनेचा लाल पिवळा लाल असा रंग असलेला झेंडा, अधिवेशनाचा फलक लावण्यात आलेला आहे. त्यामुळे एक प्रसन्न वातावरणात एसटी कर्मचाऱ्यांची या अधिवेशनाला असलेले हजेरी लक्षवेधी ठरत आहे. 

कोल्हापुरी फेटे बांधून स्वागत 
अधिवेशनाला एसटीच्या महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने आल्या आहेत. पारंपारिक वेशभूषा करून आलेल्या या महिला कर्मचारी यांना संघटनेतर्फे कोल्हापुरी फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. 

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यावा, वेतनवाढीचा प्रश्‍न सोडवावा, एसटीचे खासगीकरण नको, याउलट एसटीला राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ठकरून घ्यावे, अशा मागण्या आहेत. त्याबाबत या अधिवेशनात चर्चा होईल. परिवहन मंत्री या विषयावर काय भाष्य करतात, याची उत्सुकता आहे. 
- प्रकाश आव्हाड, संघटना, सदस्य नाशिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The burden of ST employees for the future