सोशल मिडियातून इचलकरंजीतील 'या' रूग्णालयाची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद...

case registered against anonymity for defaming hospital in Ichalkaranji through social media
case registered against anonymity for defaming hospital in Ichalkaranji through social media
Updated on: 

इचलकरंजी - सोशल मिडियातून इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयाची (आयजीएम) बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार रूग्णालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. महेश महाडिक यांनी दिली आहे.

आयजीएम रूग्णालय सध्या शासनाच्या आरोग्य विभागाकडून चालविण्यात येत आहे. गेल्या तीन-चार महिन्यापासून रूग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी अविरतपणे रूग्ण सेवा देत आहेत. कोरोनाच्या माहामारीत आयजीएम रूग्णालयाकडून रूग्णांना चांगली सुविधा देण्याचे प्रयत्न आहेत. असे असताना अज्ञात व्यक्तीने रूग्णालयात भटकी कुत्री मोकाट फिरत असल्याचा जुना व्हिडीओ सोशल मिडियातून व्हायरल केला. हा प्रकार रूग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आला.

या व्हिडीओच्या माध्यमातून रूग्णालयाकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नाहक बदनामी करण्याचा हेतू दिसून येत असल्याने प्रशासनाने पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करून रूग्णालयाची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. आर. शेटे यांनी दिली आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com